♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

रविकांत तुपकरांच्या प्रयत्नांना यश; शेतकऱ्यांना मिळणार शेतात रात्रीची सिंगल फेज लाईट वळती, सवणा, सोमठाणा दिवठाण्याच्या शेतकऱ्यांना स्वाभिमानीच्या पुढाकाराने दिलासा

MH 28 News Live, चिखली : तालुक्यातील सवणा, वळती, सोमठाणा व दिवठाणा येथील शेतकऱ्यांनी रात्रीचे शेतात वास्तव्यास असलेल्यां शेतकऱ्यांकरिता शेतात रात्रीची सिंगल फेज लाईट मिळावी अशी मागणी सवणा येथील शेतकऱ्यांसमवेत स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी रविकांत तुपकर यांच्याकडे केली होती. तुपकरांनी याची तातडीने दखल घेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व महावितरणचे अभियंता यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीचा सिंगल फेज पुरवठा मिळाण्यासाठी वळती पावरहाऊस येथील एस.डी.टी. रोहित्र कामास मंजुरात मिळाली आहे.

 

ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकऱ्यांनी शेतात भाजीपाला लावला आहे. अनेकांचे शेतात पोल्ट्री, शेळीपालन,व इतर व्यवसाय असुन यामुळे शेतकरी शेतात वास्तव्यास आहेत. शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी थ्री फेज लाईट देण्यात येते; परंतु ती आठ तासच आणि त्यातही विद्युत पुरवठा सातत्याने खंडीत होत असतो. रात्रीची शेतात गोठ्यावर लाईट राहत नसल्याने व चोरीचे प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी शेतात राहण्यासाठी धजावत नसल्याचे दिसून आले आहे. त्याकरिता वळती येथील पावर हाऊस वरुन रात्रीची सिंगल फेज लाईट देण्यात यावी,अशी मागणी सवणा येथील शेतकऱ्यांसह सरनाईक यांनी स्वाभिमानी चे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडे करण्यात आली होती. तर याची तातडीने दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे तुपकरांनी याबाबत दि. ३जानेवारी रोजी मागणी केली होती. दरम्यान दि. ९ मार्च रोजी जिल्ह्यातील महावितरणच्या विजेच्या कामासांठी एकुण १ कोटी ९० लाख ४५ हजार ९६६ रुपये किमतीच्या कामास जिल्हा नियोजन अंतर्गत मंजुरात मिळाली.

 

या अंतर्गत सवणा, वळती, सोमठाणा व दिवठाणा, शिवारातील ग्राहकांसाठी रात्रीचा शेतात सिंगल फेज पुरवठा करण्याकरीता ११ के व्हि एस डी टी रोहित्र कामास मंजुरात देण्यात आली असल्याने परीसरातील एकुन ५२ ट्रान्सफार्मरवर वळती सबस्टेशनद्वारे हा सिंगल फेज पुरवठा होणार आहे. यापूर्वीच्या ग्राहकांव्यतिरिक्त कनेक्शन अर्ज केल्यास या परिसरातील शेतकरी यांना लाईट मिळणार असल्याने या भागातील व्यवसायीक शेतकरी यांना मोठा दिलासा स्वाभिमानी च्या पुढाकाराने मिळाला आहे.

 

चिखली तालुक्यातील इतर कामेही मंजूर झाली असून यामध्ये मालगणी येथील खांब बदलणे, पळसखेड येथे अतिरीक्त रोहित्र बसवणे यासह मेरा व चिखली तालुक्यातील इतर कामासही मंजुरात मिळाली आहे.

सिंगल फेज पुरवठ्यामूळे शेतकऱ्यांच्या शेतात लागणार रात्रीचे दिवे

सवणा येथील शेतकऱ्यांनी रविकांत तुपकर यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी रात्रीची लाईटची समस्या सोडवावी अशी मागणी करण्यात आली होती. तुपकरांनी याकरिता निधी उपलब्ध करुन व कायमस्वरुपी यावर तोडगा काढु असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. त्यांनी आपला शब्द पाळला असून या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात रात्रीचे दिवे लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129