
मध्यरात्री थरार; तरुणाचा धारदार शस्त्राने खून, देऊळगाव राजा हादरले !
MH 28 News Live / देऊळगाव राजा : जालना रोडवरील एका ढाब्याजवळ सोमवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेत एका ३० वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. मृत तरुण सागर डीगंबर डुकरे (वय ३०, रा. किन्ही ताठे, ता. जाफ्राबाद) असे असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी रात्री सागर डुकरे आपल्या काही मित्रांसह जालना रोडवरील ढाब्यावर थांबला होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्यात अज्ञात कारणावरून जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर क्षणात हाणामारीत झाले.
या दरम्यान, आरोपी अक्षय कुकडे आणि त्याच्या एका साथीदाराने सागरवर धारदार शस्त्राने वार केले. विशेषतः पोटात चाकूने घाव घालून त्याचा जागीच खून करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत सागरला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. देऊळगाव राजा पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तपास अधिकारी पुढील तपास करत आहेत.