♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

संभाजीनगर येथील राज ठाकरेंच्या ऐतिहासिक सभेला आवर्जुन उपस्थित रहा – मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांचे आवाहन. सर्वांची जाण्या येण्याची केली व्यवस्था

MH 28 News Live, चिखली : मुंबई – ठाणे या नंतर आता राज ठाकरे यांची संभाजी नगर मध्ये ऐतिहासिक जाहीर सभा होणार आहे. संभाजी नगर मधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर दिनांक १ मे रोजी सायंकाळी ५ : ३० वाजता ही सभा होणार असुन या ऐतिहासीक सभेसाठी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, तालुकाध्यक्ष विनोद खरपास यांनी केले आहे.

संभाजी नगर येथे होणाऱ्या सभेला चिखली श र, तालुका व बुलडाणा जिल्ह्यातील मनसे कार्यकर्ते व राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे हजारो बांधव हजर राहणार आहेत. सभेमध्ये उपस्थित राहू इच्छिणार्यांनी दि.१ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजता मनसे जनसंपर्क कार्यालय चिखली येथे उपस्थित रहावे. या ठिकाणाहून सर्वांसाठी जाण्या-येण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129