♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कृषी महोत्सवात विजय भुतेकर सन्मानित

MH 28 News Live, सवणा कृषी महोत्सव २०२२ जिजामाता महाविद्यालयाच्या प्रांगणात बुलडाणा येथे दि. २८ मार्च सोमवारला संपन्न झाला या कृषी महोत्सवामध्ये सन २०२० – २१ या वर्षी रब्बी हंगाम हरभरा पीक स्पर्धा सर्वसाधारण गट चिखली तालुक्यामधून तालुकास्तरावर प्रथम पुरस्कार मिळाल्या बद्दल विजय हिंमतराव भुतेकर सवणा यांचा शाल श्रीफळ प्रमाण पत्र तसेच सन्मान चिन्ह देऊन जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा कृषी अधीक्षक नरेंद्र नाईक, डॉ. पी. के. व्ही. सदस्य विनायक सरनाईक, कृषी विज्ञान केद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ सी. पी. जायभाये, डॉ प्रमोद बकाने,क्रुषि विकास अधिकारी अनिसा महाबळे, बेतीवार,संतोष डाबरे,पटेल, कृषी विज्ञान केद्र जळगाव जामोदचे प्रमुख विकास जाधव, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रशात कोठे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या क्रुषि विभागा द्वारे सन राज्यस्तरीय पिक स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेची सुरुवात रब्बी हंगाम २०२० – २१ पासुन करण्यात आली.या स्पर्धे मध्ये चिखली तालुक्यातुन बरेच शेतकऱ्यांनी भाग घेतला होता यातील सवणा येथील प्रगतशील शेतकरी विजय हिमंतराव भुतेकर यांनी तालुक्यातुन प्रथम क्रमांक पटकाविला शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतुने राज्य शासनाने कृषी विभागामार्फत राज्य स्तरीय पिक स्पर्धा आयोजीत केली होती.या स्पर्धेत विजय भुतेकर यांनी हेक्टरी ३२ क्किंटल ५० किलो इतके विक्रमी उत्पादन हरभरा फुले विक्रम या पिकातुन मागील वर्षी घेतले आहे.या भागातील प्रगतशील शेतकरी म्हणुन त्याची ओळख आहे. या वेळी शेतकरी उत्पादक कंपनीचे पदाधिकारी शेतकरी गटाचे सदस्य तथा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129