♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शेगावच्या युवकावरील सूडबुद्धीने दाखल केलेले खोटे गुन्हे खारीज करावे

MH 28 News Live, जळगाव जामोद : शेगाव येथील युवकावर परस्पर सूडबुद्धीने दाखल खोट्या गुन्ह्याची वरिष्ठ करून चौकशी करून तात्काळ गुन्हे खारीज करावेत यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत विश्व हिंदू परिषद बजरंग दल व भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

13 एप्रिलला शेगाव येथे एम पी डी सी येथील अनधिकृतरीत्या सुरु असलेल्या मेळा बाजारात मुलीच्या छेडखानी प्रकरणात स्थानिक नागरिक व आयोजक यांच्यात शाब्दिक वाद झाला आयोजकास जाब विचारला असता विचारला वाद वाढत असल्याने दोन्ही गटातील व्यक्तींनी मध्यस्थी करून शांतता ठेवण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या वरिष्ठांना चुकीची माहिती देऊन सदर प्रकरण वाढवत हेतू परस्पर पणे सूडबुद्धीने निष्पाप युवकावर भा द वि च्या कलमाखाली 353 भादवि सारखे गुन्हे दाखल करून खोटी कारवाई केली. सदर बाबीचा सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडून विश्व हिंदू परिषद बजरंग दल व भाजपा यांनी निषेध केला. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून खोटे गुन्हे खारीज करून वरिष्ठ पातळीवर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात जिल्हाधिकारी यांच्याकडे उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांना देण्यात आले. निवेदनावर बजरंग दल जिल्हा संयोजक नंदकिशोर दलाल, उद्धव सातव, ज्ञानेश्वर कराळे, भाजप शहर अध्यक्ष अभिमन्यू भगत, तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, माजी अध्यक्ष सीमा डोबे, भाजपा महिला शहराध्यक्ष शिल्पा भगत, सरचिटणीस कैलास पाटील, भगतसिंग चव्हाण, रवींद्र ढोकणे, शैलेंद्र बोराडे,अमोल भगत,अशोक नानकदे पांडुरंग मिसाळ अशा अनेक व्यक्तींच्या व पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129