ब्रह्मपुरी वाडी येथील रस्त्याचे नूतीकरण रखडले, चालता येईना गावकऱ्यांची वाट बिकट !
MH 28 News Live, किन्होळा : सततच्या अवकाळी पावसामुळे रस्त्या वर जे खड्डे पडले त्याच्या मध्ये पाणी चिखल गारा झाला पायी चालण्यासाठी रस्ता योग्य राहिला नाही कधीही अपघात होऊ शकतो या त्रासातून गावकरी कधी मुक्त होणार याची प्रतीक्षा कधी संपणार नर्क यातनेतून कधी सुटकारा मिळणार पोकळ आश्वासन गावकऱ्यांचे जीवावर बेतत आहे. परिसरातील ब्रह्मपुरी वाडी येथून केळवद ते धोडप मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिक आणि विद्याथ्र्यांची गैरसोय होत आहे. जवळपास सहा महिन्यांपूर्वी मान्यता मिळूनही काही तांत्रिक कारणास्तव या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम रखडल्याने प्रशासनावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
ब्रह्मपुरी वाडी फाट्यापासून केळवद ते धोडप मार्गाला जोडणारा साधारणतः एक किलोमीटर लांबीचा रस्ता तीन ते चार वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. गावात जाणारा हा मुख्य रस्ता असून, त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दाट झाडे-झुडपेही वाढली आहेत. गावातील शिक्षणासाठी जात असतात. विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना या रस्त्यावरून पायी व वाहनांद्वारे जाताना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे आणि झुडपांमुळे अपघात घडून जीवित हानी होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. जवळपास दीड़ वर्षांपासून गैरसोय होत असल्याने बांधकाम विभागाबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ब्रह्मपुरी वाडी ग्रामपंचायतीने सतत पाठपुरावा करूनही बांधकाम विभागाने झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येत आहे. एकीकडे विविध ठिकाणी ‘नवीन रस्त्यांची निर्मिती आणि दुरुस्तीची केली जात आहेत. दुसरीकडे मात्र सातत्याने पाठपुरावा करूनही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता याबाबत कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रस्त्यालगतच्या नाल्याही अनेक विद्यार्थी या रस्त्याने किन्होळा येथे बुजल्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे.
अंदाज पत्रकाप्रमाणे काम व्हावे – प्रभाकर भुतेकर, सरपंच, ब्रह्मपुरी वाडी
या ब्रह्मपुरी वाडी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या तयार करण्यात आल्या. मात्र, या नाल्याही बुजल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत पाणी रस्त्यावर येऊन आणखीच बिकट स्थिती होण्याची शक्यता आहे. काम लवकर सुरू व्हावे अशी ग्रामपंचायत व गावकऱ्यामार्फत विनंती केली जात आहे नाहीतर लोकशाही प्रमाणे उपोषण करू. रस्त्याची दुर्दशा झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यात यावे. तसेच हे काम अंदाज पत्रकाप्रमाणे तसेच दर्जेदार करण्यात यावे.
३० लाखांचा निधी मंजूर मात्र मुहूर्त कधी निघणार ?
रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाला जवळपास सहा महिन्यांपूर्वी मान्यता मिळाली आहे. त्यासाठी सुमारे ३० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव या रस्त्याचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे या कामाचा मुहूर्त कधी निघणार, तसेच आणखी किती काळ गैरसोय सहन करावी लागणार, असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत.
या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाला जवळपास सहा महिन्यांपूर्वी मान्यता मिळाली आहे. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव या रस्त्याचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नसल्याचे सांगितले जात आहे. तांत्रिक अडचणी मार्गी लावून संबंधित विभागाने पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी ब्रम्हपुरी वाडी येथील ग्रामस्थांकडून केली
जात आहे. नाहीतर लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल असा इशारा पांडुरंग गुरुजी सचिन वानखेडे, सुखदेव टेलर, शेख इब्राहिम, राहुल वानखेडे यांनी दिला आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button