♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सिंचनाच्या विषयावर भारतभाऊंचा पुढाकार; महायुतीच्या आमदारांची विकासात्मक हातमिळवणी; खडकपूर्णा उपसा सिंचन योजना टप्पा क्रं. १ ते ४ चे झाले जलपूजन

MH 28 News Live : बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरच्या चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा यासह बुलढाणा आणि मेहकर तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या खडकपूर्णा मध्यम सिंचन प्रकल्पाचे प्रणेते माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांच्यासाठी ‘ सिंचन ‘ हा नेहमीच आस्थेचा विषय राहिला आहे, जिल्ह्यातील सिंचनाच्या लहान – मोठ्या प्रकल्पांच्या ठिकाणी जाऊन त्यांची वेळोवेळी पाहणी करणे, अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना करणे, शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून त्या शासनापर्यंत पोहोचवणे व त्यातून मार्ग काढणे ही कामे कोणत्याही राजकीय लाभाविना भारतभाऊ सातत्याने करत असतात. म्हणूनच त्यांना ‘ जलपुरुष ‘ म्हटले जाते. भारतभाऊंचा हा पुढाकार आज सुद्धा दिसून आला त्यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २६ डिसेंबर रोजी खडकपूर्णा प्रकल्प विभागाअंतर्गत उपसा जलसिंचन योजना टप्पा क्रमांक १ ते ४ चे जलपूजन पार पडले. सिंदखेडराजा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांचे वडील अंकुशराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एड. नाजीर काझी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या शुभकार्याची सुरुवात झाली. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंचनासारख्या महत्त्वाच्या विषयावर महायुतीमधील आमदारांनी केलेली ही हातमिळवणी जिल्ह्यासाठी निश्चितच आशादायक म्हणावे लागेल.

आज खडकपुर्णा प्रकल्प विभाग अंतर्गत उपसा सिंचन योजना टप्पा क्रं.१ ते ४ च्या जलपूजनाचा कार्यक्रम रामनगर येथे भारतभाऊ बोंद्रे यांच्या शुभहस्ते व आ. मनोज कायंदे, ऍड. नाझेर काझी, अंकुशराव पडघान, इरफान अली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. ( आमदार श्वेताताई महाले यादेखील सदर कार्यक्रमाला उपस्थित राहणार होत्या. मात्र, काही अपरिहार्य कारणामुळे त्या चिखली येथे पोहचू शकल्या नसल्याने प्रत्यक्ष येऊ शकल्या नाहीत. त्यांचे प्रतिनिधित्व श्वेताताईंचे वडील अंकुशराव पाटील यांनी केले होते )
या प्रसंगी शेनफडराव घुबे, एकनाथराव थुट्टे, मनोज दांडगे, श्री भराड श्री परीहार, कृष्णाकुमार सपकाळ, साहेबराव पाटील, केशव नागरे, राजू भगत, शेखर बोंद्रे व या परिसरातील पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सरपंच, व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129