♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हम साथ साथ है…! स्थानिक रणसंग्रामात महाविकास आघाडीची एकजूट; काँग्रेस, रा. कॉं. ( शरद पवार ) व शिवसेना उबाठा यांनी बुलढाण्यातून सत्ताधाऱ्यांना दिलं थेट आव्हान !

MH 28 News Live / चिखली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं काऊंटडाऊन सुरू झालं असून, सत्ताधारी महायुतीविरोधात महाविकास आघाडीने जिल्ह्यातील निवडणूका एकत्रित लढण्याचा नारा बुलढाण्यातून दिला आहे. बुलढाणा शहरातील हॉटेल नर्मदा येथे २२ जूनला पार पडलेल्या आघाडीच्या महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय बैठकीत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या प्रमुख घटक पक्षांनी आगामी निवडणुका संयुक्त ताकदीने लढण्याचा निर्णय घेतला.

या बैठकीत शेतकरी कर्जमाफी, रखडलेले पीककर्ज, पीक विमा, ग्रामीण भागातील बेरोजगारी, तरुणांच्या समस्यांसह अनेक सामाजिक विषयांवर सखोल चर्चा झाली. “जनतेचे प्रश्न हेच आमचे निवडणूक अजेंडे असतील,” असा ठाम निर्धार आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केला.

बैठकीला माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्याम उमाळकर, आमदार धीरज लिंगाडे, आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार नानाभाऊ कोकरे, माजी आमदार राजेश एकडे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि युवासेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सर्व घटकांनी मतभेद बाजूला ठेवून, ‘एकदिलाने आणि संयुक्त रणनीतीने’ निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. “महाविकास आघाडी ही आता जनतेच्या आशा-अपेक्षांची प्रतिनिधी बनली असून, सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर आमचा प्रहार असणार आहे,” असा इशारा नेत्यांनी दिला.

या बैठकीने बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात नवचैतन्य निर्माण केलं असून, महाविकास आघाडीच्या एकजुटीचा प्रभाव स्थानिक राजकारणावर दूरगामी पडण्याची शक्यता आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129