
हास्य रसाची उधळण.. ‘ वेड्यांचा दरबार ‘ या आमच्या मराठी विनोदी वेब सिरीजचे झाले आज लोकर्पण
MH 28 News Liveचि / खली : ‘वेड्यांचा दरबार’ या मराठी विनोदी वेब सिरीजचा युट्युब प्रीमियर समारंभ आज अतिशय उत्साहात पार पडला. युट्युबवर पहिला भाग आज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या वेब सिरीजचे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय शुभम सोरमारे या गुणी युवा कलावंताने केले आहे. माझ्यासह मदनराव गायकवाड, मनोहर पवार, शुभम इंगळे, विजय जोशी आणि विनायक भानूसे यांच्याही भूमिका या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहेत.
आजच्या शुभप्रसंगी श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पंडितदादा देशमुख, माजी नगराध्यक्ष सुहासभाऊ शेटे यांच्या हस्ते कलेची देवता श्री नटराजाचे पूजन व वेब सिरीज च्या पहिल्या तीन एपिसोडचे युट्युबवर अपलोडिंग करण्यात आले. पत्रकार गोपाल तुपकर व मंगेश पळसकर, भाजपा शहराध्यक्ष सागर पुरोहित, युवा मोर्चा शहराध्यक्ष विजय वाळेकर भवताल थेटर प्रमुख विनय शुक्ल व युवा नाट्य कलावंत प्रसन्न डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत या वेब सिरीजचे औपचारिक लोकर्पण झाले. याप्रसंगी अभिनय व संगीत क्षेत्राशी संबंधित असलेले कलावंत व तंत्रज्ञ अमोल निकाळजे, शैलेंद्र नाटेकर, प्रवीण कांबळे, शोभा सुरडकर, अनुराधा भावसार, अभिजित टाले, गजानन बोर्डे, बाला ठाकूर, अमोल चांगाडे हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते. श्री गावंडे साहेब, माधव मोरंपल्ले मुजम्मिल शेख, कडूबा गवारे, जंगले मामा या रसिकांची देखील सदर कार्यक्रमास उपस्थिती लाभली.
चिखली शहरातील अभिनय क्षेत्रातल्या कलावंतांनी हाती घेतलेल्या या नव्या प्रयोगाबद्दल सर्व कलावंतांचे कौतुक व अभिनंदन करून पंडितदादा देशमुख यांनी आपल्या प्रमुख भाषणातून शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच पुढील उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेब सिरीज लेखक व दिग्दर्शक शुभम सोरमारे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मालिकेत विनोदी भूमिका साकारणारे पत्रकार रेणुकादास मुळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या मालिकेतील अभिनेते मदनराव गायकवाड, विजय जोशी, शुभमअभिनेत यांच्यासह श्रीमती चंद्रप्रभा सोरमारे, सरिता सोरमारे, संध्या गायकवाड, माधुरी गायकवाड, वैभव साळवे संदेश सुरडकर यांनी सहकार्य केले.
वेब सिरीजची लिंक खाली दिली आहे