♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

तोंडावर स्प्रे मारून दिवसाढवळ्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; संतप्त नागरिकांनी आरोपींना पकडले

MH 28 News Live / मलकापूर : जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मलकापूर ते मोताळा मार्गावर (Malkapur–Motalā Road) दिवसाढवळ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नागरिकांच्या तत्परतेमुळे आरोपींचा डाव हाणून पाडण्यात आला आणि तिन्ही आरोपी नागरिकांच्या तावडीत सापडले.

मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावरून जात असलेल्या १४ वर्षीय मुलीला गाठले. तिला बेशुद्ध करण्याच्या उद्देशाने त्यांनी तिच्या तोंडावर स्प्रे मारला आणि जबरदस्तीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला.

या प्रकाराची चाहूल लागताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ सावधगिरी दाखवत आरोपींच्या कारचा पाठलाग केला. काही अंतरावर नागरिकांनी आरोपींना गाठून पकडले. संतप्त जमावाने तिन्ही आरोपींना चांगलाच धडा शिकवला तसेच त्यांच्या कारचीही तोडफोड केली.

आरोपी बीड आणि यूपीचे ?

मारहाणीनंतर नागरिकांनी तिन्ही आरोपींना बोरखेडी पोलिसांच्या ताब्यात दिले. प्राथमिक चौकशीत हे आरोपी बीड आणि उत्तर प्रदेशातील असल्याचे समोर आले आहे. अपहरणाचा हेतू नेमका काय होता याचा तपास सुरू असून पोलिसांनी घटनेचा गंभीरतेने तपास हाती घेतला आहे. नागरिकांच्या धाडसामुळे संभाव्य अनर्थ टळला; पोलिसांकडून आरोपींवर कठोर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129