♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कासारखेड परिसरात बिबट्याचा हल्ला; कालवडीचा बळी

MH 28 News Live / मेहकर : तालुक्यातील कासारखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली असून एका कालवडीचा बळी गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कासारखेड येथील शेतकरी सतिश दादाराव सवडतकर हे गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी आपल्या शेतात गेले असता त्यांनी शेतात बांधलेली दोन जनावरे पाहिली. यामधील चार ते पाच वर्षे वयाची कालवड बिबट्याने ठार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच सतिश मवाळ यांनी तात्काळ घाटबोरी वनपरिक्षेत्राअंतर्गत व्ही. टी. मापारी वनपाल (माडवा वर्तुळ) तसेच वडाळी बिटचे वनरक्षक एस. ए. पडघान यांना दूरध्वनीद्वारे कळवले. माहितीची दखल घेत वन विभागाचे अधिकारी सकाळी सुमारे १० वाजता घटनास्थळी पोहोचले व पाहणी केली. यावेळी तलाठी देशमुख, कृषी सहाय्यक वाघमारे, राजू सवडतकर, सतिश मवाळ यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

विशेष म्हणजे ३१ डिसेंबरच्या सकाळी कळंबेश्वर, दुधा, रायपूर या परिसरातही बिबट्याची पिल्ले आढळून आली होती, ती वन विभागाने ताब्यात घेतली होती. त्यामुळे सदर भागात बिबट्यांचा वावर वाढल्याचे स्पष्ट होत असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कासारखेड परिसरात ऊस, तूर, गहू, हरभरा अशी पिके मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे शेती पंपासाठी वीजपुरवठा दिवसा करण्यात यावा, अशी जोरदार मागणी कासारखेड व परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. वन विभागाने योग्य ती उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशीही अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129