
छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त बुलडाण्यात अभिवादन
MH 28 News Live, बुलडाणा :
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित उपक्रमाअंतर्गत पंधराव्या दिवशी दि. १७ मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. बुलडाणा शहरातील कारंजा चौक परिसरात दुर्गामाता मंदिरामध्ये झालेल्या कार्यक्रमास अनेक शहरातील अनेक तरुणांची उपस्थिती होती
क्रूरकर्मा औरंगजेबाच्या छळछावणी मध्ये अनेक दिवस अनन्वित अत्याचार आणि शारीरिक यातना सोसून देखील ज्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत आपला धर्म सोडला नाही असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणादायी स्मृतिप्रीत्यर्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळला जातो. या अंतर्गत प्रत्येक गावात वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना एकत्रित करून संभाजी महाराजांच्या जीवनाबद्दल माहिती दिली जात माहिती दिली जाते तसेच हिंदूंनी संघटित होऊन अत्याचारी प्रवृत्तीचा प्रतिकार करण्याचे आवाहन केले जाते. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात येते. छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास या उपक्रमाअंतर्गत बुलडाणा येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पुष्प १५ वे
स्थळ: दुर्गा माता मंदिर कारंजा चौक बुलडाणा अरविंद होंडे, चंद्रकांत काटकर, अजित गुळवे, निलेश मुठ्ठे, अंकेश मुठ्ठे, संतोष सोनुने, सोनू बाहेकार, सागर वराडे, उत्कर्ष डाफने आदी कार्यकर्ते व युवक या प्रसंगी उपस्थित होते.



