♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

विभागीय रोजगार मेळाव्याचे ३१ मार्चला आयोजन

MH 28 News Live, बुलडाणा : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, अमरावती यांच्या विद्यमाने विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन ३१ मार्च रोजी करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्यामध्ये नामांकीत खासगी उद्योजक/कंपनी/त्यांचे प्रतिनिधी विविध पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवतील. दहावी, बारावी, आय.टी.आय, पदवीका अथवा पदवी धारक पात्र पुरुष व महिला उमेदवारांना ऑनलाईन अप्लॉय करुन या ऑनलाइन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल.

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नांव नोदणी केलेल्या दहावी, बारावी, आय.टी.आय, पदवीका अथवा पदवी धारक पात्र पुरुष व महिला उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्ड (Employment card) चा युजर व पासवर्ड वापर करुन आपल्या लॉगीन मधुन ऑनलाइन अप्लॉय करु शकतात. ऑनलाईन अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या कंपनी, उद्योजक, एच.आर. प्रतिनिधी यांचे कडून ऑनलाईन मुलाखती घेवुन निवड प्रक्रिया राबवतील. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे प्रस्तुत रोजगार मेळाव्याला ऑनलाईन अप्लाय करण्याचे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती प्रा.यो.बारस्कर यांनी केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129