♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लोणारमध्ये अनाधिकृत मोबाईल टावरवर धडक कारवाई. ४ टॉवरला पालिकेने लावले सिल. लाखो रुपयांची थकबाकी

MH 28 News Live, लोणार : शहरातील ४ विविध मोबाईल कंपन्यांनी आपली टाँवर्स उभारली. मात्र काही कंपन्यांनी नियमांची पूर्तता न केल्याने व त्यांच्याकडे लाखो रुपयांची कराची थकबाकी असल्याने अश्या अनधिकृत मोबाईल टॉवर्सना सील करण्याची कारवाई लोणार नगरपालिकेचे मुख्यधिकारी विठ्ठल केदारे यांनी आज केली. यामध्ये अनेक प्रमुख मोबाईल कंपन्यांच्या टाँवर्सना सील लागले असून सदर कारवाईचे शहरात कौतुक होत आहे.

नगरपालिकेमध्ये नोंद असलेली टॉवर पैकी काही टॉवर अनाधिकृत आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता टावर उभारणी केली आहे व अनधिकृतरित्या वीज जोडणी घेतली आहे. अशा ४ टॉवर वर नगर परिषद मार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. नगर परिषदने वारंवार सूचना देऊनही व कागदोपत्री व्यवहार करून ही कोणत्याही प्रकारची परवानगी त्यांनी घेतलेली नाही. या टॉवरवर तब्बल लाखो रुपयाची थकबाकी आहे. त्यामुळे आज नगर परिषदने धडक कारवाई केली.

सील करण्यात आलेल्या टाँवरमध्ये प्रामुख्याने एटीसी टेलिकॉम अंतर्गत आयडिया, वोडाफोन, टाटा, एअरटेल अशा विविध कंपनीच्या टाँवरचा समावेश आहे. या कारवाईमध्ये मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्यासमवेत पथक प्रमुख एस.एस.थोरात, कर निरीक्षक अन्वर शहा, फुलचंद व्यास, संजीव ऐनेवार, अशोक निचंग, गजानन बाजड, प्रभू सानप श्रीराम,सूर्यवंशी, विजय आढाव किरण गरकळ, नागरे, अशोक मानकर पोलीस विभागाचे भगवान नागरे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी शहरातील नागरिकांनी नगरपरिषदला कर भरून सहकार्य करावे होणाऱ्या अप्रिय कारवाई टाळावी असे आवाहन केले. आजच्या धडक कारवाईमुळे मोबाईल टाँवर कंपन्यांच्या उरात धडकी भरली असून एकच खळबळ उडाली आहे. मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129