♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिंच परिसरातील ते स्वच्छता गृह पुन्हा बांधा – महाराष्ट्र कामगार शक्ती सेनेचे निवेदन

MH 28 News Live, चिखली : शहरातील चिंच परिसरात दोन / तीन वर्षांपूर्वी नगर पालिकेचे सार्वजनिक स्वच्छता गृह ( मुत्री ) होते. परंतु, सध्या ते तोडण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकाची मोठी गैरसोय होत आहे. हे स्वच्छता गृह पुन्हा बांधण्यात यावे अशी मागणी शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली.

या मागणीसाठी दि. २६ मे रोजी नगर पालिका प्रशासनाला एक निवेदन सादर करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र महाराष्ट्र कामगार शक्ती सेनेचे विदर्भ अध्यक्ष म. इप्तेखार जमादार, माजी नगरसेवक प्रदीप पचेरवाल, जनहित मंचचे संयोजक म्हणून रेणुकादास मुळे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप मेहेत्रे, राजेंद्र सुरडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख प्रशांत डोंगरदिवे, महाराष्ट्र कामगार शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान शेख व जिल्हा सचिव सोहिल शहा उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129