♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

घराचे कुलूप तोडून दीड लाखाचा मुद्देमाल लंपास. खामगावात घरफोडी

MH 28 News Live, खामगाव : तलाव रोड भागातील कासलीवाल लेआउट मधील रहिवाशी दुर्गा संजय राठी (४०) ह्या काल १८ जानेवारी २३ रोजी सकाळी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. त्यांच्या मुलीची परिक्षा सुरू असल्यामुळे ती शेजारच्या घरी थांबली होती.

आज १९ जानेवारी रोजी सकाळी ती घरी आली असता तीला घराचे कुलूप तुटलेले दिसले. तीने परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती दिली व घरात जावुन पाहणी केली असता अज्ञात चोरट्याने कपाट फोडुन सोन्याचांदीचे दागिने व रोख असा एकुण अंदाजे दीड लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याचे दिसुन आले. वृत्त लिहेपर्यंत तक्रार देण्यासाठी दुर्गा राठी ह्या शहर पोस्टेमध्ये दाखल झाल्या होत्या. घराला कुलूप लागले असल्याची संधी साधुन अज्ञात चोरटे चोऱ्या करीत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी कुलूप तोडून चोया करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांची रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129