♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हँड टू हँड फायटिंग स्पोर्ट्स राष्ट्रीय स्पर्धा 2022, लखनऊ, उत्तर प्रदेश. चिखलीच्या सुमित खंडारेला मिळाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार. विजय वाळेकर यांची HSFI, INDIA, DEVELOPMENT COMMITTEE,पदी निवड

MH 28 News Live, चिखली : राष्ट्रीय हँड टू हँड फायटिंग स्पोर्ट्स राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ दुसरा स्थानी आला असून या स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्याला ४ सुवर्ण, ४ रजत, तसेच २ कांस्य पदके मिळाली. जिल्ह्यातील विजय वाळेकर यांची HSFI, INDIA, DEVELOPMENT COMMITTEE पदी या स्पर्धेदरम्यान निवड करण्यात आली.

उत्तर प्रदेशातील लखनौ येथील
लालजी टंडन चौक स्टेडियम येथे २७ मार्चपासून आयोजित फर्स्ट हँड टू हँड फायटिंग स्पोर्ट्सची रंगीत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा. आज समारोप झालेल्या अंतिम फेरीत उत्तर प्रदेशच्या संघाने २० सुवर्ण पदके, १० रौप्य पदके व ६ कांस्य पदकांसह विजेतेपद पटकावले, तर महाराष्ट्राने १७ सुवर्ण पदके, १६ रौप्य पदके व ११ कांस्य पदकासह द्वितीय विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर महाराष्ट्रतर्फे खेळणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचा सुमित खंडारे याला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देण्यात याला. यासोबतच HSFA,BULDHANA संघटनेचे अध्यक्ष विजय वाळेकर यांची भारतीय संघाच्या डेव्हलपमेंट कमिटीच्या डायरेक्ट पदावर नियुक्ती करण्यात आली.

सदर स्पर्धेत फाईट इव्हेंट मध्ये जिल्ह्यातील खेळाडू सुमित खंडारे, संकेत जाधव, सुशील जाधव व शुभम जाधव यांना वेगवेगळ्या गटामध्ये सुवर्णपदक प्राप्त मिळाले तसेच निशांत आराख, कनिष्क बन्सोडे, मनीष गवई आणि लॉरेन सिद्दीकी यांना रजत पदक प्राप्त झाले, यामध्ये सेल्फ डिफेन्स इव्हेंन्टमध्ये मनीष गवई आणि लॉरेन सिद्दीकी यांना कांस्य पदक प्राप्त झाले. सर्व पदक विजेत्यांची १९ मे ते २३ मे दरम्यान उझबेकिस्तानमध्ये होणाऱ्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात इटलीतील मिलान येथे होणाऱ्या प्रौढ (वरिष्ठ) जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे.

या स्पर्धेच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर प्रदेश ऑलम्पिक असोसिएशनचे असिस्टंट सेक्रेटरी, आनंद किशोर पांडे, डॉ इंद्रामणी, संचालक, पशुसंवर्धन विभाग, उत्तर प्रदेश सरकार आणि अभियंता अवनीश कुमार सिंग, सदस्य विधान परिषद, लखनौ विभाग, पदवीधर क्षेत्र, उत्तर प्रदेश आणि डॉ. वैभव प्रताप सिंग हे उपस्थित होते.
सदर राष्ट्रीय स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल प्रशिक्षक, पंच आणि आयोजन समितीच्या सदस्यांचे HSFI, INDIA चे अध्यक्ष प्रदीप शिंदे यांनी अभिनंदन करून सर्व खेळाडूंचे त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुक केले. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व सचिव राहुल मेश्राम तसेच HSFA, बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय वाळेकर यांनीं केले

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129