
प्रजासत्ताक दिनी खंडागळे हॉस्पिटल व अतिदक्षता विभागाचे स्थलांतर विदयाधर महाले यांच्या हस्ते उद्घाटन; आ. श्वेताताई महाले यांची लाभणार प्रमुख उपस्थिती
MH 28 News Live / चिखली : मागील ७ वर्षांपासून चिखलीकरांना दर्जेदार वैदयकिय सेवा पुरविणााऱ्या खंडागळे हॉस्पिटल व अतिदक्षता विभागाचा भव्यं स्थलांतरण सोहळा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आला असून या भव्यं स्थलांतरण सोहळयासाठी उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रं फडणविस यांचे खाजगी सचिव विदयाधर महाले हे लाभणार असून चिखली विधानसभेच्या आ. श्वेताताई महाले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
डॉ. श्रीकृष्ण आत्माराम खंडागळे हे मागील अनेक वर्षांपासून चिखलीकरांना दर्जेदार वैदयकिय सेवा पुरवित आहेत. डॉ. कृष्णा आत्माराम खंडागळे यांचे शिक्षण M.B.B.S. M.D. (मेडिसिन) K.E.M. Mumbai इथपर्यंत झाले असून त्यांनी आतापर्यंत माजी स्पेशालिटी मेडीकल ऑफीसर (के.ई.एम. हॉस्पिटल, मुंबई) , माजी सिनीअर रजिस्ट्रार (घाटी हॉस्पिटल, छ. संभाजीनगर) , माजी सहाय्यक प्राध्यापक (घाटी हॉस्पिटल, छ. संभाजीनगर) , माजी कन्सल्टंट (एम्स हॉस्पिटल, छ. संभाजीनगर) माजी ज्यूनिअर कन्सल्टंट (एमआयटी हॉस्पिटल, छ. संभाजीनगर) या ठिकाणी आपली वैदयकिय सेवा दिली आहे.
या सुसज्जं हॉस्टिटलमध्ये सुसज्ज आय.सी.यु , कार्डिअॅक मॉनिटर्स , सेंट्रल ऑक्सिजन , २४ तास अत्यावश्यक सेवा ,कृत्रिम श्वासोश्वास यंत्र (व्हेंटीलेटर), जनरल वार्ड, बायपॅप व्हेंटीलेटर,,२४ तास मेडिकल, अद्यावत ई.सी.जी,,पॅथॉलॉजी लॅब, डिफेब्रीलेटर ,सिरींज पंप , संपूर्ण आरोग्य तपासणी TMT (Stress Test) , Digital X-Ray सुविधा उपल्ब्ध असून निदान व उपचार – रक्तदाब (बी.पी) , हृदयरोग, विषबाधा, थायरॉईड , मधुमेह , डेंगू, मलेरिया, सर्पदंश, मेंदुचे विकार , टायफॉईड लिव्हर व पोटाचे आजार , टी.बी., दमा , संसर्गजन्य आजार , किडनीचे विकार , अर्धांगवायु (पॅरेलीसीस) , संधिवात इत्यादि रोगांवर इलाज करण्यात येणार आहे.
२६ जानेवारी रोजी जुना मेहकर रोड , बालाजी अर्बन पतसंस्थेजवळ या नविन व सुसज्जं हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असून उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रं फडणविस यांचे खाजगी सचिव विदयाधर महाले हे लाभणार असून चिखली विधानसभेच्या आमदार मा सौ. श्वेताताई महाले पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ रामेश्वर दळवी , अध्यक्ष , आय एम ए चिखली, डॉ. संदिप वाघ , अध्यक्ष सि.एम.ए. चिखली, डॉ. अमोल गिते , जिल्हा आरोग्यं अधिकारी , डॉ. भागवत भुसारी जिल्हा शल्यं चिकीत्सकं, डॉ. उमर सय्य्द एम एस चिखली, डॉ. प्रिया विनकर , टिएचओ चिखली आदि मान्यवर लाभणार असून या सोहळण्याला चिखली डॉक्टरं असोसिएशन , चिखली केमीस्ट ॲण्डं ड्रगिस्टं असोसिएशन , चिखली लॅब असोसिएशन , व्हाईस ऑफ मिडीया चिखली तालुका यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. तरी या उदघाटन सोहळयाला उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. श्रीकृष्णा आत्माराम खंडागळे व डॉ. सौ. पुजा श्रीकृष्णा खंडागळे यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button