♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

डोक्यात टामी घालून केला खून; प्रेयसीला कॉलवर कॉल करुन अडकला स्वतः होऊन… डोकं फिरलेल्या कर्जबाजारी माणसाची विचित्र ‘ शॉर्ट स्टोरी ‘

MH 28 News Live / लोणार : तो कर्जबाजारी झाला असल्याने ट्रक लुटण्याच्या उद्देशाने त्याने आपल्यालाच मदत करणाऱ्या ट्रक चालकाचा खून करून त्याचा मृतदेह ट्रकच्या टूल बॉक्स मध्ये टाकला. ट्रकमधील सामान विकण्याच्या उद्देशाने तो ट्रक घेऊन सुसाट निघाला. मात्र अशाही अवस्थेत प्रेयसीसी बोलण्याचा मोह त्याला आवरला नाही आणि ट्रकच्या टूल बॉक्समध्ये टाकलेल्या त्या मृतदेहाला दुर्गंधी सुटली, ट्रक मधील मालाला गिऱ्हाईक मिळेना.. अशा सगळ्याच विचित्र गुंतागुंतीमुळे अखेर ‘ तो ‘ लवकरच पोलिसांच्या तावडीत सापडला तेही आपल्या दोन मित्रांना आपल्यासोबत या प्रकरणात अडकवून. काय घडले ते सविस्तर वाचा या शॉर्ट स्टोरीमध्ये…

ट्रक चालकाचा खून करणारा हा लोणार तालुक्यातील सुलतानपूरचा राहणारा असून त्याचे नाव गणेश वसंता पवार असे आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी त्याचे दोन साथीदार गणेश गजानन कुटे (सुलतानपुर) आणि ज्ञानेश्वर गणेश घायाळ (रा. गायखेडा, ता.लोणार) यांनाही अटक केली आहे.

विजय मुरलीधर राऊत (५२, रा. केडगांव, अहिल्यानगर) असे खुन झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर मधील आडगांव बुद्रूक मध्ये सोलापूर-धुळे महामार्गावर एक ट्रक बेवारस अवस्थेमध्ये आढळला होता. पोलिसांनी तपासणी केली असता ट्रकच्या टूल बॉक्समध्ये एक मृतदेह आढळला. मृतदेहावर गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या. त्यामुळे ट्रकचालकाचा खून झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. ट्रकमध्येच पोलिसांना राऊत यांचा मोबाईल देखील सापडला. या मोबाईल वरून एकाच व्यक्तीला ११ कॉल केले गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तपासात पोलिसांनी सुलतानपूरच्या गणेश पवार याला अटक केली. आधी उडवा उडवीची उत्तरे देणाऱ्या गणेशने खुनाची कबुली दिली.

रायपूर (छत्तीसगड) येथून विजय राऊत यांनी ट्रकमध्ये अडीच टन लोखंडी सळई भरल्या. ते घेऊन ते अहिल्यानगरला येणार होते. रायपूरमध्ये बदली चालक म्हणून काम करणाऱ्या गणेश पवारने विजय राऊत यांना मेहकर पर्यंत सोडण्याची विनंती केली. १९ जानेवारीला ते रायपूर मधून निघाले. सोमवारी सकाळी १० वाजता विजय राऊत आणि गणेश पवार यांनी कारंजा मध्ये नाश्ता केला. त्यानंतर स्वतः गणेश पवारने ट्रकचे स्टेरिंग हाती घेत विजय राऊत यांना आराम करायला सांगितले. राऊत हे झोपेत असतानाच गणेश पवारने टॉमी ने डोके ठेचून त्यांची हत्या केली. गणेश पवार हा ट्रक घेऊन मेहकर जवळ आला, तेथे त्याचे मित्र घायाळ आणि कुटे त्याला मिळाले. मेहकरमध्येच त्यांनी ३० हजारात काही लोखंडी सळई विकल्या. त्यानंतर तिघेही ट्रक घेऊन जालन्याच्या दिशेने निघाले. जालन्यात त्यांना खरेदीदार मिळाला नाही. म्हणून ते छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाले.

दरम्यान, विजय राऊत यांची हत्या करून बराच काळ झाल्यामुळे ट्रक मध्ये दुर्गंधी सुटली. ट्रक मध्ये रूम फ्रेशनर मारत ते संभाजीनगरकडे निघाले. मात्र ट्रक मधील मालाला खरेदीदार मिळत नसल्याने ट्रक रस्त्यात सोडून तिघेही गावाकडे निघून गेले.

असा झाला गुन्ह्याचा उलगडा

विजय राऊत यांची हत्या करणारा गणेश पवार हा कर्जबाजारी आहे. राऊत आणि गणेश पवार यांची कामानिमित्ताने भेट होत असे. १९ जानेवारीला रायपूरमध्ये दोघांची भेट झाली. राऊत यांना अडीच टन लोखंडाच्या ट्रान्सपोर्टचे काम मिळाल्याचे गणेशने पाहिले. तेव्हाच त्यांनी या लोखंडावर डल्ला मारण्याचा कट रचला आणि राऊत यांची हत्या केली. मात्र गणेश पवार हा त्याच्या लफडेबाजीमुळे अलगद अडकला. ट्रक प्रवासात गणेशचा मोबाईल स्विच ऑफ झाला. त्यामुळे त्याने मृत राऊत यांच्या फोनवरून प्रेयसीला ११ कॉल केले. पोलीस तपासात ही बाब समोर आल्यानंतर गणेशचा कारनामा समोर आला. शिवाय टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज मध्ये देखील गणेश हा राऊत यांच्यासोबत असल्याचे समोर आले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129