♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सह्याद्री कृषी पर्यटनला इटालियन पाहुण्यांची भेट. अस्सल ग्रामीण पाहूणचाराचे केले कौतुक

MH 28 News Live, उंद्री : सतत दुष्काळाशी किंवा अतिवृष्टीशी सामना करणाऱ्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये वैरागड गावाच्या माळरानावर साकारलेले सह्याद्री कृषी पर्यटन ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. इटली येथील परदेशी पाहुण्यांनी नुकतीच येथे भेट दिली. महाराष्ट्राची
ग्रामीण जीवन शैली, भोजन पद्धती तथा विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनाचा अनुभव या माध्यमातून परदेशी पाहुण्यांना घेता आला.

इटली येथे योगगुरू म्हणून गेल्या २७ वर्षापासून काम करणारे श्री माहीकृष्णबाबा हे भारतीय दौऱ्यावर त्यांच्या शिक्षकांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी आणत असतात. यावेळी त्यांनी आपल्या सोबतच्या परदेशी पाहुण्यांना मोहाडी घाटाखाली असलेल्या सह्याद्री कृषी पर्यटन या ठिकाणी आणले. महाराष्ट्राचे ग्रामीण शेती पद्धती आणि ग्रामीण कला यांचा प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी मिळवून दिला. सह्याद्री कृषी पर्यटनाचे संचालक पवन साठे यांनी या परदेशी पाहुण्यांचा पारीवारीक आदरसत्कार केला. नुकताच महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरणानुसार सह्याद्री कृषी पर्यटनला एमटीडीसी अंतर्गत मान्यता मिळालेली आहे. उंच डोंगर दरी व शेताच्या मधातून वाहणारा नाला त्याप्रमाणे शेतावर केलेले विविध प्रयोग आणि सेंद्रिय शेती या माध्यमातून शेतीकडून व्यवसायाकडे आणि व्यवसायातून शेती हा मूलमंत्र विदर्भातील शेतकऱ्यांना नक्कीच संदेश देणारा ठरणार आहे.

माहीकृष्णलीला बाबांविषयी…

मुळ भारतीय असलेले श्री माहीकृष्णलीला बाबा हे गेल्या काही वर्षांपासून इटलीमध्ये वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली दौऱ्यावर असताना त्यांनी योग्य गुरुमायी बाबा कृष्णलीला यांची आवर्जून भेट घेतली होती. बाबांच्या शिष्यगणांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर शिव तांडव स्तोत्र सादर केले होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129