
हरहर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमली उल्का नगरी
MH 28 News Live, लोणार : शहरातून चोथ्या व अखेरच्या श्रावण सोमवारा निमित्त भव्यदिव्य कावड यात्रा धर्मवीर महाकाल कावड संघाच्या वतीने सकाळी ८.३० वाजता पवित्र असे विरज धारतीर्थ येथून काढण्यात आली. विरज धारतीर्थाचे पवित्र जल घेऊन ही कावड यात्रा सुरू झाली. सर्वप्रथम जुन्या नगरपरिषद कार्यालयाच्या जवळ स्वामी मित्र मंडळाच्या वतीने या सर्व कावड यात्रेतील शिवभक्तांना चहा पाणी व फराळाचे वाटप करण्यात आले. शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशराव मापारी नगरपरिषचे गटनेते भूषण पाटील मापारी युवासेनेचे तालुका प्रमुख गजानन मापारी यांनी कावडीमधील शवलिंग व महादेव मूर्तीचे पूजन केले. या वेळी सुबोध संचेती, दिनेश पुरोहित, दर्शन शर्मा, अथर्व कानिटकर, सुदेश खरात, गजानन अंभोरे, मनोहर खरात, धोंडू पुरोहित, राहुल मापारी, सुनील मापारी, ऋषिकेश मापारी आदी उपस्थित होते.
या नंतर विनायक चौक येथे शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांच्या वतीने विधिवत कावडीचे पूजन करण्यात आले. याशिवाय फराळ व चहा पाणी वाटप करण्यात आले. या वेळी शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी, डॉ राजेश मुंदडा, शंतनू मापारी, संजय वायाळ, अशोक वारे, राहुल मापारी, योगेश मापारी, अरुण गीते, पांडुरंग मुंडे, दीपक सरकटे, दत्ता भगत, गोपाल मापारी, पंकज नागरे, दत्ता दुधमोगरे आदी उवस्थित होते.
या नंतर सदर कावड यात्रेचे स्वागत पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा शिवसेना कार्यकर्ते संदीप मापारी यांच्या वतीने चहा पाणी व उसळीचे वाटप करण्यात आले. या वेळी शिवसेना कार्यकर्ते राहुल मापारी, पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, प्रवक्ता राहुल सरदार, जेष्ठ पत्रकार गोपाल तोष्णीवाल, राजेश बोरा, तुळशीदास पसरटे, बाळू सरदार यांनी कावड यात्रेचे स्वागत करून शिवलिंग व महादेव मूर्तीचे पूजन केले. या नंतर ही कावड यात्रा गायखेड मार्गे पळसखेड येथील महादेव मंदिरात नेण्यात आली तिथे महाआरती करून कावड यात्रेचे विसर्जन करण्यात आले.
या कावड यात्रे साठी धर्मवीर महाकाल प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. या साठी शहरातील शेकडो तरुण या कावड मध्ये सहभागी झाले होते ही यात्रा प्रशासनाने सांगितलेल्या नियमाप्रमाणे पार पडली. या वेळी पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त होता.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button