♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“उंद्री” झाले आता “उदयनगर”… शासनाकडून अधिसूचना जारी. आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांचे फळ

MH 28 News Live, चिखली : तालुक्यातील उंद्री या गावाचे नाव बदलून उदय नगर करण्यात आल्याची अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्याने उंद्री चे नाव
” उदयनगर ” करण्यासाठी आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

महाराष्ट्र शासन असाधारण भाग एक – मध्य उप-विभाग वर्ष ८, अंक २४] मंगळवार, मे ३१, २०२२ / ज्येष्ठ १०, शके १९४४ असाधारण क्रमांक ३६ प्राधिकृत प्रकाशन , सामान्य प्रशासन विभाग , राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० मे २०२२.यांचे वतीने अधिसूचना क्रमांक गाना – २७१८/प्र.क्र.१७५/२९-मौजे “उंद्री” या गावाचे नाव बदलून ते “उदयनगर ” असे करण्याच्या प्रस्तावास भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र क्रमांक ११/२३/२०२१-M&G, दिनांक १७ फेब्रुवारी, २०२२ अन्वये दिलेल्या अनुमतीनुसार महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे असा आदेश देत आहे की, मौजे ” उंद्री “, ता. चिखली, जि. बुलडाणा या गावाचे नाव बदलून ते मौजे ” उदयनगर”, ता. चिखली, जि. बुलडाणा असे करण्यात यावे. सर्व संबंधितांनी वरील बदलाची नोंद आपल्या राज्य शासकीय अभिलेखांमध्ये खालीलप्रमाणे घ्यावी : 11देवनागरी मराठी मध्ये उदयनगर , देवनागरी हिंदी मध्ये उदयनगर , रोमन UDAYNAGAR अशी नोंद घेण्याच्या महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, आदेशित करण्यात आले आहे.

आ. महाले यांच्या प्रयत्नातून सादर केला होता सुधारित प्रस्ताव

उंद्री हे नाव शिवी दिल्यासारखे असल्याने चिखली तालुक्यातील उंद्री या गावचे नाव उदयनगर असे करावे अशी मागणी अनेक दिवसांपासून उंद्रीचे ग्रामस्थ करीत होते . ग्रामस्थांच्या मागणीनुसार आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी त्या महिला व बाल कल्याण सभापती असतानाच याबाबत शासनाकडे मागणी केली होती . परंतु लालफितशाहीत अडकलेल्या फाईलला आ सौ श्वेताताई महाले यांनी पाय लावून पळविल्याने या प्रकरणाची नव्याने त्रुटींची पूर्तता करून सादर केल्याने उंद्रीचे उदयनगर असे नामकरण करण्याचा मार्ग मोकळा केला होता.

2018 पासून रेंगाळत पडलेल्या उंद्रीच्या नामकरण फाईलला सुद्धा खऱ्या अर्थाने उंद्रीच लागली होती . ” उंद्री ” लागणे किंवा ” उंद्री ” या शब्दातून उपरोधिक किंवा शिवी दिल्याचा भास होत असल्यानेच ” उंद्री ” या गावचे नाव बदलून ” उदयनगर ” करावे आ श्वेताताई महाले यांनी प्रयत्न सुरू केले होते. उंद्री (ता. चिखली जि. बुलडाणा) या गांवाचे उदयनगर असे नामांतर करण्याबाबतची मागणी आ. श्वेताताई महाले यांनी दिनांक २ मार्च २०१७ रोजी तहसिलदार चिखली यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली होती. उक्त मागणीनुसार ग्रामपंचायत उंद्री यांनी दिनांक १६/८/२०१७ रोजी ग्रामसभा व दिनांक १२/८/२०१७ रोजी ठराव घेऊन उंद्री (ता. चिखली जि. बुलडाणा) या गांवाचे उदयनगर असे नामांतर करणेबाबत ठराव मंजूर केला आहे. उंद्री या गांवाचे उदयनगर असे नामकरण करणेबाबत ग्रामपंचायत व ग्रामसभा उंद्री यांनी संमती दर्शक ठराव दिलेले असल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४, पोट कलम (एक) खंड (सहा) मधील तरतुदीनुसार उंद्री या गांवाचे उदयनगर असे नामकरण करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र क्रमांक राजस्व कक्ष ७(१) अका/कावि ३३२ / २०१८ दिनांक २१ मार्च २०१८ अन्वये मा. विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांचे मार्फत मा प्रधान सचिव, महसूल व वन विभाग यांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

परंतु केंद्रीय गृह मंत्रालयाच्या दि. ११ सप्टेंबर, १९५३ पत्रामधील मार्गदर्शक तत्त्वातील सूचनांप्रमाणे प्रस्ताव नसल्याने तो मंजूर होऊ शकला नाही . त्यामुळे आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला . त्यांच्या पाठपुराव्यामुळे दि 21 जुलै 2021 रोजी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव यांच्याकडून विभागीय आयुक्त अमरावती यांना सुधारित व निकषानुसार प्रस्ताव सादर करण्याचे पत्र दिले होते. त्या पत्रानुसार सुधारित, परिपूर्ण व आवश्यक त्या शिफारशी सह दि 26 / 8/2021 रोजी जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांचे मार्फत राज्य शासनाकडेप्रस्ताव सादर करण्यात आला होता . त्यावर महाराष्ट्र शासनाने हा परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला होता.

उंद्री गावाच्या उदय नगर नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकार कडे सादर करण्यात आला होता. त्याला मान्यता मिळावी यासाठी आ सौ श्वेता ताई महाले यांनी केंद्राकडे सुद्धा सातत्याने पाठपुरावा केला होता. दि. 6 आणि 7 एप्रिल 2022 रोजी आ सौ श्वेता ताई महाले पाटील या दिल्ली येथे नवीन निवडून आलेल्या आमदारांच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी गेल्या असता त्यांनी केंद्रिय गृह मंत्री मा ना अमीत भाई शहा यांची भेट घेऊन त्यांना लेखी पत्र देउन उंद्री च्या नामकरण प्रस्तावाला मान्यता देण्याची विनंती केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने उंद्रीचे उदयनगर करण्याबाबत संमती देऊन राज्य सरकारला सदर नाम करणाबाबत राज पत्रात प्रसिध्दी देण्याबाबत कळविले होते . त्यानुसार राज्य शासनाने ३१ मे २०२२ रोजीच्या राजपत्रात उंद्री चे नाव उदय नगर करण्याबाबत प्रसिध्दी मिळाल्याने सर्व शासकिय अभिलेख्यात आता उदयनगर उदयास आल्याने आ. श्वेता ताई महाले पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील एखाद्या गावाचे नामकरणाचा पहिल्यांदाच मान स्वातंत्र्यानंतर मान मिळाला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129