♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लग्नावरून परत येताना अंजनी बु. येथील फोटो ग्राफरवर मालेगाव बायपासवर काळाचा घाला

MH 28 News Live, मेहकर : तालुक्यातील अंजनी बु. येथील अमर गजानन ढोरे वय वर्ष 22 वर्षे याचा व मित्र गणेश विजय खडसे हे दोघे वाशिम येथुन लग्न समारंभामध्ये व्हिडिओ शुटींग काढण्याकरता गेले होते. दि. 7 जुलै रोजी पार पडलेल्या विवाह सोहळ्याचे सर्व क्षण त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. कार्यक्रम आटोपून येत असतांना मालेगाव बायपासवर रात्री 11 वाजताच्या सुमारास त्यांचा अपघातात झाला. त्यामध्ये अमर गजानन ढोरे याचा घटस्थळीच मुत्यु झाला तर गणेश खडसे हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. घडलेल्या घटनेमुळे अंजनी गावावर शोककळा पसरली आहे.

वाशिम येथून लग्न समारंभामध्ये व्हिडिओ शूटिंग काढून परत येत असताना मालेगाव बायपास वर रात्री अकरा वाजताच्या सुमारास अमर गजानन ढोरे याच्या पल्सर गाडी क्रमांक MH 28 B 8875 या दुचाकीला ट्रक क्रमांक GJ 05 AY 4111 या ट्रकने धडक दिली. त्यामुळे अमर ढोरे यांचा घटनास्थळीत मृत्यू झाला. अमोलच्या पश्चात आई, वडील,आजी आहे. आई -वडलांना तो एकुलता एकच मुलगा होता, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129