♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मोताळा तालुक्यातील शेखर मिटकरी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चमकला; धावण्याच्या स्पर्धेत पटकावला द्वितीय क्रमांक

MH 28 News Live, मोताळा : तालुक्यातील वाडी (रिधोरा)गट ग्रा.पं मधील ५०० लोकसंख्याचे छोट्याशा खेडे गावातील शेखर सुनील मिटकरी याने महाराष्ट्र युथ गेम कौन्सिल तर्फे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे दि.१८,१९,२० फेब्रुवारी आयोजित राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत रोजी २१ वर्षीय वयोगटातील धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रंमाक पटकावला.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी भरारी घेत मध्य प्रदेशातील ग्वालीयर येथिल ओपन नॕशनल युथ गेम्स कौन्सिलिंग आॕफ इंडीया या राॕष्ट्रीय गेम स्पर्धेत दुसरा क्रंमाक मिळवला. राज्यस्तरावर प्रथम क्रंमाक तर मध्य प्रदेशातील ग्वालीयरच्या मैदानी खेळातुन राॕष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्याचे नाव नावलौकिक करणाऱ्या शेखर मिटकरी याचे रिधोरा व वाडी गावासह परिसरात सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129