
रोजगार वार्ता – पश्चिम रेल्वे देणार परीक्षेविना नोकरी; ४ आँक्टोबरपर्यंत करा अर्ज
MH 28 News Live : रेल्वेत नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण पश्चिम रेल्वे अंतर्गत गट क पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०२२ आहे.
अटी आणि नियम
पदाचे नाव – गट क
पद संख्या – २१.
नोकरी ठिकाण – मुंबई.
परीक्षा शुल्क –
सर्वसाधारण गट – ५०० रुपये
SC/ST/Ex-servicemen/women, Minorities and economic backward class – २५० रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन.
अर्ज सुरू होण्याची तारीख – ५ सप्टेंबर २०२२.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ ऑक्टोबर २०२२
अधिकृत वेबसाईट – www.wr.indianrailways.gov.in
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी rrc.wr.com ला भेट द्यावी.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज विचारात घेतले जातील.