♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी रक्तदानातून जीवनदान – आ. श्वेताताई महाले 

MH 28 News Live, चिखली : भारताला विश्व गुरू बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त चिखली विधानसभा मतदारसंघातून 224 रक्तदात्यांनी रक्त दानातून जीवनदान दिल्याचे गौरवोद्गार आ. श्वेताताई महाले यांनी रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी काढले.

दि. 17 सप्टेंबंर 2022 रोजी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या वाढदिवशी चिखली, धाड आणि अमडापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तीनही ठिकाणी प्रत्येकी 71 जणांनी रक्तदान केल्याने एकूण 224 रक्त दात्यांनी रक्त दान करुन जीवनदान महा यज्ञात आपल्या रक्त रुपी समिधा टाकलेल्या अर्पण केली. हा रक्तदानाचा महायज्ञ नेहमी असाच धगधगत ठेवण्याचा आपण प्रयत्न करु या असे आवाहन देखील आ. श्वेताताई महाले यांनी यावेळी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली विधानसभा मतदारसंघात विविध जनहिताचे उपक्रम मोठ्या उत्साहात राबवले जात आहेत. ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ उपक्रमात चिखली शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, चिखली येथे, ग्रामीण रुग्णालय धाड तर प्राथमिक आरोग्य केंद्र अमडापूर येथे झालेल्या रक्तदान शिबिरास मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129