
काल चिखलीत तर आज अमडापुरातून आणखी एक तरुणी बेपत्ता. ब्युटी पार्लरच्या कामासाठी बुलडाण्याला मैत्रीणीकडे गेली होती…
MH 28 News Live, अमडापूर : तालुक्यातून तरुण मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण हळूहळू वाढत चालल्याचे दिसत आहे. काल चिखली येथील गजानन नगरातून एक तरुणी रातोरात घरातून निघून बेपत्ता झाली तर त्याचीच पुनरावृत्ती आज अमरापुर येथे घडली. अमरापूर गावातील एक तरुणी आपल्या मैत्रिणीकडे बुलडाण्याला ब्युटी पार्लरच्या कामासाठी जाते असे सांगून घरातून निघून गेली ते अद्याप पावेतो परत आली नाही. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबीय आणि आपली मुलगी हरवल्याची तक्रार अमडापुर पोलीस स्टेशनला दाखल केली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, अमडापूर येथील १९ वर्षाची एक युवती दि. १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता घरातून बाहेर पडली. बुलडाणा येथील आपल्या मैत्रीणीकडे ब्युटी पार्लरच्या कामासाठी जाते असे सांगून निघाली. सदर तरुणी सायंकाळी घरी परत न आल्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. परंतु, ती कुठेही आढळून आली नाही. अखेर आज दि. १२ एप्रिल रोजी मुलीच्या आईने अमडापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अमडापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
लागोपाठ तरूण मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण चिखली तालुक्यामध्ये वाढत असल्याची बाब हा चिंतेचा विषय असून या संदर्भात बुलडाणा पोलिसांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असून नागरिकांनी देखील योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button