
शेतकऱ्यांच्या सतर्कतेने एक अग्नितांडव होता होता वाचले, जानेफळला टळला मोठा अनर्थ
MH 28 News Live, मेहकर : जानेफळ येथील पाळखांबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागात दि. ७ एप्रिल रोजी भर दुपारी आग लागली. ही आग संपूर्ण माळावरून गहू असलेल्या शेताच्या दिशेने फिरली होती; परंतु, तेथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सविस्तर वृत्त असे की,स्थानिक जानेफळ येथील पाळखांबा भागात भरदुपारी अज्ञात व्यक्तीने टाकावू कचरा पेटवून दिला. तेव्हा हवा इतकी जोरात होती की बघताबघता सगळा माळ पेट घेऊ लागला. पत्रकार गणेश सवडतकर, कास्तकार भारत यवतकर यांचे शेत या माळालाच लागून आहे. त्यांच्या शेतात गहू असून तो थोड्याच अंतरावर होता. थोडासा जरी हलगर्जीपणा झाला असता तर अनर्थ घडला असता अशी परिस्थिती होती. घटनेची माहिती मिळताच परिसरातील कास्तकार रवी नाके, स्वप्नील नाके, सुभाष तांगडे संतोष पाखरे, भारत यवतकर गोपाल नाके, अक्षय गायकवाड, पिंटू यवतकर, राजू लोणकर, उत्तमराव नाके, संतोष मुरडकर, शेख अहेमद, प्रमोद यवतकर, गजानन पाखरे यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करत आणि झाडाच्या ओल्या फांदया वापरत व काहींनी आपल्या मोटारी सुरु करत एक तास सुरु असलेल्या ह्या अग्नीतांडवावर नियंत्रण मिळवले.
ही माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते कृष्णा हावरे व पत्रकार गणेश सवडतकर यांनी घटनास्थळी जात शेतकऱ्यांना मदत केली. एकूणच म्हणजे पाळखांबा परिसरातील तरुण शेतकऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दाखविलेल्या धाडसाने अनेक लोकांच्या पिकांचे होणारे नुकसान टळले. त्यांनी दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button