♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी बॅडन्यूज! UPI पेमेंटसाठी लिमिट, पाहा किती आणि कसं असणार

MH 28 News Live : कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट वाढले आहेत. तुम्ही जर UPI पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. गुगल पे (जीपे), फोनपे, अॅमेझॉन पे आणि पेटीएम अशा सर्वच कंपन्यांनी पेमेंटवर लिमिट लावलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्यात अडचणी येऊ शकतात. पैसे ट्रान्सफर करताना तुम्हाला हे लिमिट माहिती नसेल तर नुकसान होऊ शकतं.

पेमेंटवर लिमिट लावल्याने त्याचा परिणाम देशातील कोट्यवधी यूपीआय युजर्सना होणार आहे. एनपीसीआयकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करून माहिती देण्यात आली आहे.

प्रत्येक दिवशी किती पाठवता येणार पैसे ?

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्सनुसार आता यूपीआयमधून तुम्ही दररोज 1 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता. त्याचबरोबर काही छोट्या बँकांनी ही मर्यादा 25 हजारांपर्यंत निश्चित केली आहे. प्रत्येक अॅपनुसार हा नियम बदलतो त्यामुळे कोणत्या अँपसाठी किती मर्यादा लावण्यात आल्या आहेत पाहा.

 

Amazon Pay द्वारे पेमेंट करणाऱ्यांना 1,00,000 रुपयांपर्यंत पैसे पाठवता येणार आहेत. Amazon Pay UPI रजिस्ट्रेशननंतर 24 तासांनी तुम्हाला केवळ 5000 रुपये पहिले पाठवता येतील. तर बँकेनं 20 व्यवहार करता येणार आहेत.

पेटीएम यूपीआयने युजर्ससाठी एक लाख रुपयांपर्यंतची मर्यादा सेट करण्यात आली आहे. पेटीएमने दर तासाला किती पैसे पाठवायचे याची मर्यादाही घालून दिली आहे. पेटीएमने म्हटले आहे की, आता तुम्ही दर तासाला फक्त 20 हजार रुपयांचेच व्यवहार करू शकता. याशिवाय तासाला 5 व्यवहार आणि एका दिवसात फक्त 20 व्यवहार करता येणार आहेत.

 

फोनपेने दररोज यूपीआय व्यवहार मर्यादा 1,00,000 रुपये निश्चित केली आहे. तसेच, एखादी व्यक्ती बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार फोनपे यूपीआयद्वारे दररोज जास्तीत जास्त 10 किंवा 20 व्यवहार करू शकते.

Google Pay या अँपद्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी केवळ 10 ट्रान्झाक्शनची मर्यादा आहे. त्यामुळे पेमेंट करताना आता जरा जपूनच करा. नाहीतर तुमचं लिमिट संपलं तर ट्रान्झाक्शन होणार नाही. तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंत पैसे पाठवता येऊ शकतात. या अॅप्समध्ये प्रत्येक तासाची मर्यादा नसते.

गुगल पे आणि फोनपेवर दर तासानुसार कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र, अॅपच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीने तुम्हाला 2000 रुपयांपेक्षा अधिक रकमेची मनी रिक्वेस्ट पाठवली ते ट्रान्झाक्शन होणार नाही किंवा हॉल्टवर राहिल. त्यामुळे पैसे पाठवण्याआधी या गोष्टींची काळजी घ्या.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129