♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

श्री मुंगसाजी महाराज सूतगिरणीची सातवी निवडणुक अविरोध. अध्यक्षपदी तिसऱ्यांदा राहुल बोंद्रे तर उपाध्यक्षपदी जगन्नाथ पाटील

MH 28 News Live, चिखली : आठव्या पंचवार्षीक योजनेतील विदर्भातील पहिलीच सुरू झालेली श्री मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणीची वाटचाल सुरू आहे. सूतगिरणीची नुकतीच संपन्न झालेली सातवी निवडणूक अविरोध झाली असुन अध्यक्षपदी सलग तिस-यांदा माजी आमदार राहुल बोंद्रे यांची तर उपाध्यक्षपदी पंचायत समितीचे माजी सभापती जगन्नाथ पाटील यांची अविरोध निवड करण्यात आली.

 

सूतगिरणीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गीतेशचंद्र साबळे यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन राजेंद्र काळे यांनी काम पाहीले. श्री मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणीची पार पडलेली निवडणुकी ही सलग सातव्यांदा अविरोध पाडली हे येथे उल्लेखणीय.

चिखलीच्या अनुराधा नगरातील उजाड माळरानावर जवळपास 35 वर्षा पूर्वी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या कल्पक दुरदृष्टीकोनातून श्री मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणीची उभारणी करण्यात आली. एकीकडे विदर्भातील सूतगिरण्या तोटयात असतांना ही सुतगिरणी मात्र तात्यासाहेबांच्या मार्गदर्शनात व माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या देखरेखीत नफ्यात वाटचाल करीत आहे. श्री मुंगसाजी महाराज सूतगिरणीचा निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत 19 आँक्टोंब पासून निवडणूक प्रक्रीया सुरू झाली होती. दि. 23 डिसेंबर रोजी सहकारी संस्थेच्या सर्व नवनिर्वाचीत संचालक मंडळाची विषेष सभा पार पडली. त्यात माजी आमदार राहुल बोंद्रे यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्षपदी पंचायत समितीचे माजी सभापती जगन्नाथ पाटील यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळी संचालक म्हणुन धनपालसिंग चांदा, फारूक सौदागर, किशोर हिवरकर, राजेष जानकीराम लोखंडे, समाधान परीहार, दत्तात्रय परसने, नंदकिशोर शिंदे, समाधान सुपेकर, जगन्नाथ उंबरकर, अँड. वृषाली बोंद्रे, मंदाबाई जाधव, संतोष वानखेडे, दीपक हाके व प्रकाष गणपत यांची वर्णी लागली आहे. सूतगिरणीचे व्यवस्थापक विशाल मवाळ व कर्मचा-यांनी निवडणुक प्रसंगी परिश्रम घेतले.

भागधारकांच्या विश्वसावरच सुगिरणीची उत्तुंग भरारी – राहुल बोंद्रे

चिखली परीसरातील शेतक-यांची समर्थ साथ व भागधारकांनी श्री मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणीवर दर्शविलेल्या विष्वासामुळेच सुतगिरणीची वाटचाल प्रगतीपथावर असून ही सहकार क्षेत्रात घेतलेली उत्तुंग भरारी ठरत असल्याचे प्रतिपादन सूतगिरणीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी यावेळी बोलतांना केले. ते पुढे म्हणाले केंद्रातील सरकारच्या शेतकरी विरोधी धोंरणामुळे विदर्भातील शेतक-यांशी निगडीत सहकार क्षेत्रातील उद्योग धंदे बंद पडत आहेत. त्यातच जवळपास सुतगिरण्या बंद पडत असतांना चिखलीतील ही सुतगिरणी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या कुशल मार्गदर्षनात यशस्वी वाटचाल करीत आहे. शेतक-यांच्या उत्पादित मालाला चांगले उत्पन्न म्हणजेच चांगला भाव मिळाला तरच शेतक-यांचा आर्थिक स्तर उंचावेल, शेतक-यांनी भाववाढीच्या हक्कासाठी भांडले पाहीजे तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरगोस उत्पन्न घेतले पाहीजे. यावेळी बोंद्रे यांनी आपले सर्व सहकारी नवनिर्वाचित उपाध्यक्ष व संचालक मंडळास शुभेच्छा दिल्या.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129