
बोरगाव काकडे येथे किरकोळ वादातून हाणामारी :; औरंगाबाद येथे उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू :; ४ जणा विरुद्ध गुन्हा दाखल
MH 28 News Live, अमडापूर : चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे येथे किरकोळ वादातून लोखंडी रॉड ने झालेल्या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि.५ एप्रिल रोजी रात्री ९.०० वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या युवकावर प्रथम बुलढाणा नंतर औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र दि १० एप्रिल रोजी या युवकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला असून, नातेवाईकाच्या अमडापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून चार जणां विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणा बाबतची तक्रार निलेश भगवान सोरमारे वय ३० वर्ष रा. बोरगाव काकडे, याने अमडापूर पोलीस स्टेशनला तक्रारी मध्ये नमूद केले आहे की, दि ५ एप्रिल रोजी आरोपी शे.नुर शेख शकरजी , नजराना बी शेख.नुर , चाँद शेख शकरजी, विठ्ठल अशोक खांबाईतकर सर्व रा. बोरगाव काकडे हे आमचे घरासमोर शिविगाळ करण्यास लागले असता . मी व माझा भाऊ योगेश भगवान सोरमारे असे त्याना म्हटले की, आमचे घरासमोर शिविगाळ करु नका या कारणावरुन आरोपींनी हातात लोखंडी रॉड घेऊन योगेश सोरमारे याच्या डोक्यावर मारुन गंभीर जख्मी केले. त्याला गंभीर मार असल्याने बुलढाणा येथून औरंगाबाद घाटी येथे भरती करण्यात आले होते.दि. १० एप्रिल रोजी भाऊ योगेश भगवान सोरमारे वय २६ वर्ष यांचा मृत्यू झाला आहे. अशा तक्रारीवरून अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये प्रथम अपन. १५३/ २०२२ कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४, गुन्हा दाखल करून आज वाढिव कलम ३०२ भादवी प्रमाणे दाखल करून वरील चारही आरोपींना अटक करून पुढील तपास ठाणेदार नागेश कुमार चतरकर हे करिता आहे.



