♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पंतप्रधानांना दिल्लीत भेटल्या आ. श्वेताताई महाले; केली सिंचन सुविधेची मागणी

MH 28 News Live, चिखली : विदर्भातील प्रस्तावित असलेल्या वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पामध्ये पैनगंगा नदीवर असलेल्या मध्ये पेनटाकळी धरणामध्ये आणून नेहमीच दुष्काळग्रस्त असलेले दक्षिण बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी आ. श्वेताताई महाले यांनी आज पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांच्या कडे दिल्ली येथे झालेल्या भेटीदरम्यान पत्र देऊन केली. सोबतच बुलडाणा जिल्हा व पश्चिम विदर्भात सोयाबीन पीक मोठया प्रमाणात घेतल्या जात असल्याने चिखली येथे शासकिय सोयाबीन प्रक्रिया उद्योग आणण्याची सुद्धा मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

पहिल्यांदा निवडून आलेल्या विधान सभा सदस्यांकरिता संसदेच्या “पार्लमेंटरी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसिस” (PRIDE) (Erstwhile BPST) या संस्थेमार्फत नवी दिल्ली येथे दिनांक ५ व ६ एप्रिल २०२२ रोजी अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आलेला आहे. सदर अभ्यास वर्गात सहभागी झालेली आहे. अभ्यास वर्गात सहभागी सदस्यांनी पंतप्रधान मा नरेंद मोदी साहेब यांची भेट घेतली.
यावेळी माझ्या सोबत महीला आमदारांचे शिष्ट मंडळ उपस्थित होते.

अश्या व्यक्त केल्या आ. श्वेताताईंनी भावना

” विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, युगपुरुष, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांची दिल्ली येथे भेट घेऊन महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीची विशेष ओळख असलेल्या पैठणीचा शेला त्यांना भेट दिला. ”

वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे पाणी पेनटाकळी पर्यंत आणण्याची तसेच चिखली येथे सोयाबीन प्रक्रिया उद्योग आणण्याची पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेब यांच्या कडे मागणी केली.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129