
कलाशिक्षक राजेश्वर खेडेकर यांना “अष्टपैलू काव्य भूषण” पुरस्कार
MH 28 News Live, देऊळगाव राजा : येथील कलाशिक्षक राजेश्वर खेडेकर यांना अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई आयोजित “अक्षरमंच” काव्य समुहांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत सामाजिक विषयांवर उत्कृष्ट काव्यलेखन करुन सलग दोन वर्षे यशस्वी सहभाग नोंदविल्याने- श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे नुकत्याच पार पडलेल्या”राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी खैरे, कोषाध्यक्ष अनुसया खैरे तसेच साहित्यिक डॉ. मधुसुदन घाणेकर व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत खेडेकर यांना हा पुरस्कार देण्यात आला. संस्थेच्या वतीने साहित्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा अष्टपैलू काव्य भूषण – २०२२ या पुरस्काराने सन्मानित करुन ट्रॉफी, शाल – श्रीफळ व प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button