♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

केंद्र व राज्य शासनाने न्याय न दिल्यास राज्यव्यापी जेलभरो सत्याग्रह आंदोलन-भाई प्रदीप अंभोरे

MH 28 News Live, उदयनगर : उदयनगर: राज्यातील गेले ४० वर्षापासून प्रलंबित असलेल्या व १९९० पूर्वीच्या महसूल जमीन महसूल व गायरान जमिनीवरील अतिक्रमने अद्याप पर्यंत राज्य शासनाचे प्रस्तावित निर्णय असतानाही राज्य शासन कडून बुलढाणा अकोला जळगाव जिल्ह्यात निवासी जागेच्या व कृषी जमीन कायम पट्ट्यासाठी झालेल्या ५ ते ६ आत्महत्यांचे दखल अद्याप पर्यंत शासनाने घेतली नाही.उलट मा.सर्वोच्च न्यायालय निर्णयानुसार शासनाने २०११ साली शासन निर्णय घेऊन राज्यातील लाखो भूमीहिनावर पट्टे वाटप न करून अन्याय केला आणि राज्यातील २ लाख २२ हजार १५३ अतिक्रमण धारकांची बेकायदेशीर अतिक्रमणे ठरवून सर्व मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून पुन्हा एकदा विद्यमान सरकारने अतिक्रमण धारकांची फसवणूक करून त्यांच्या घरावर व उभ्या पिकावर बुलडोझर चाल वून अन्याय केला आहे याबाबत राज्य सरकारने राज्यातील महसूल गायरण निवासी जमीन कायमपट्ट्यासाठी केलेल्या शासन निर्णयाच्याअंमलबजावणीसाठी माननीय सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी अन्यथा ३१ जानेवारी २०२३ पासून विविध जनआंदोलनाच्या प्रतिनिधींना संघटित करून संयुक्त संघटने तर्फे राज्यव्यापी जेलभारो सत्याग्रह आंदोलन इशारा भाई प्रदीप अंभोरे संस्थापक यांनी शासनास निवेदन द्वारे दिला.

निवेदनात मा. उच्च न्यायालयात अतिक्रमण निष्कासन बाबत शासन कृत प्रतिज्ञा लेखा नुसार राज्यातील अतिक्रमित निष्कासन कारवाईस कायम स्थगिती द्या, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया नुसार १९९० पूर्वीच्या महसूल व गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या निवासी व कृषी जमिनीचे प पट्टे वाटप करण्याची घोषणा शासनाने तात्काळ करावी.राज्यातील शेतकऱ्यां ची कर्जमुक्ती प्रमाणे भूमिहीनां ची शंभर टक्के कर्जमुक्ती करावी राज्यातील वन जमिनीवरील प्रलंबित वन दावेदारांचे अपील दाखल होईपर्यंत वन विभागाकडून कोणती कारवाई करण्यात येऊ नये जिगाव पेंनताकळी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त अतिक्रमण धारकांच्या जमिनीवरील पिके व उद्ध निष्काशन प्रक्रिया कायम पुनर्वसन व पर्यायी जमीन द्या,राज्यातील अतिक्रमण क्षेत्रावरील व अतिक्रमण क्षेत्रावरील उभी पिके व निवासी घरे हे राष्ट्रीय संपत्ती म्हणून तिचे कायम संरक्षण व्हावे आ दीं मागण्यासाठी भूमी मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा महाराष्ट्र संघटनेच्या वतीने 28 डिसेंबर रोजी नागपूर विधिमंडळ अधिवेशनावर संघटनाप्रमुख भाई प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वात यशवंत स्टेडियम नागपूर येथून आदिवासी बांधवांच्या ढोल ताशाच्या निनादात विधानभवन वर जाणारा हजारो भूमिहीन अतिक्रमतांचा सत्याग्रह मोर्चा मॉरिशस कॉलेज रोड वर पोलिसांकडून अडवण्यात आला यावेळी भाई बाबुराव सरदार भगवान गवई अशोक इंगळे रमेश गाडेकर भाई प्रभाकर वाको डे गजानन जाधव शेषराव चव्हाण गजानन जाधव भैय्या अशोक वानखेडे दिलीप रामटेक कर आदींचे मार्गदर्शनपर भाषण झाली.

या प्रसंगी पोलीस प्रशासनामार्फत मुख्यमंत्री, महसूल मंत्री व वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांना, मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी ना. तानाजी सावंत आरोग्य मंत्री महाराष्ट्र यांचे निवेदन सादर करण्यात आले संघटनेच्या मागण्या बाबत येत्या काही दिवसात शासन स्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी शिष्टमंडळास दिले. मोर्चा यशस्वितेसाठी, भरत मुंढे, अनिस खान पठाण रामेश्वर चव्हाण संजय पाटील ज्ञानेश्वर कटोने, प्यारसिंग बामणे, नरसिंग पावरा, परसरा म गुलाब बहादुर नाडकु जलामसिंग जोमारे राजु बोरसे सुहास तायडे,कडू तायडे, राजू काकडे काशिराम रेसावल,सुपडा कठाले, साबीर भाई उपसरपंच अर्जुन गोळे जलील पठाण अंसरम सांवत आकाश तिडके,सुनील दांडगे, गणेश इंगळे,काशिराम सपकाळ,वसंत टापरे, अनंता लासुरकर,अरुण वानखेडे, मनोहर जाधव, जुलामाबई कवाजी, माया वानखेडे, सोदा पावरा, वंदना वानखेडे,आदींनी केले प्रसंगी जळगाव, बुलडाणा,अकोला,वाशिम, नागपूर, अमरावती जिल्ह्यतील अन्याय ग्रस्त हजारो अतिक्रमण धारक सत्याग्रह मोर्चात सहभागी झाले होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129