
धामणगाव बढे पो.स्टेला नवीन वर्षात मिळाले नवीन ठाणेदार. सुगदेव भोरकडे यांनी सांभाळली सूत्रे
MH 28 News Live, धामणगाव बढे : धामणगांव बढे पो.स्टे.अंतर्गत एकुण ५२ गावांचा समावेश असुन धा.बढे पो.स्टे ला कार्यरत चंद्रकांत ममताबादे यांची बदली नागपूर येथे झाल्याने त्यांचे रिक्त जागी कोण याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मावळत्या वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी धा.बढे पो.स्टे चे नविन वर्षातील नवीन ठाणेदार सुगदेव अवधुत भोरकडे यांची जिल्हा पोलीस अधिक्षक सागर आवाड यांचे आदेशाने नियुक्त झाली आहे.
ठाणेदार भोरकडे यांचे कार्याचा गुन्हेगारी, अवैध व्यवसाय व गुन्हे प्रवृत्तीवर लगाम व दबदबा असल्याने कायदा, शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित ठेवण्यावर त्यांचा अधिक भर असेल अशी अपेक्षा नागरिक करत आहेत. ठाणेदार भोरकडे यांचे समोर वाढती गुन्हेगारी , चोऱ्यांचे प्रमाण, अवैध धंदे, वरली जुगार, अवैध दारु विक्री, प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू विक्री यावर कठोर लगाम लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आव्हान असेल. नव्या वर्षाच्या पर्वावर नव्याने रुजु झालेले ठाणेदार सुगदेव भोरकडे आपल्या समोरील आव्हानांना पार करत कायदा व सुव्यवस्था कशा प्रकारे राखतात याचे उत्तर येणाऱ्या काळात मिळेलच.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button