♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मनसेच्या रक्तदान शिबीरात ९६ जणांचे रक्तदान

MH 28 News Live, चिखली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने दि. १४ जून २०२३ रोजी मनसे जनसंपर्क कार्यालय चिखली येथे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर संपन्न झाले. रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिका अधिक रक्तदान केले. शिबिरात जवळपास ९६ च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केले.

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी चिखली शहराचे आराध्य दैवत श्री रेणुका मातेच्या चरणी सकाळी पातळ अर्पण करण्यात आले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, तालुकाध्यक्ष विनोद खरपास, बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे, जिल्हा सचिव डॉ योगेश काळे, शहराध्यक्ष नारायण बापू देशमुख, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, शेतकरी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, उप तालुकाध्यक्ष संदीप नरवाडे, उप तालुकाध्यक्ष मयूर पऱ्हाड, उपशहर अध्यक्ष रवी वानखेडे, संजय पैठणकर, शहर सचिव अजय खरपास, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष स्वप्निल आसोले, मनविसेना उप तालुकाध्यक्ष अंकित इंगळे, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष अरुण येवले, विभाग अध्यक्ष समाधान मस्के, पंढरी महिंद, निशांत गायकवाड, बंटी कळमकर, सुनील ठेंग, संजय दळवी, संदीप मस्के, सुनील चव्हाण, अक्षय हिवरकर, वैभव देहाडराय, बाळू परीहार, दीपक बरबडे, गणेश कलमकर, सिद्धेश्वर रिंडे, गणेश आरमाळ, अनिल वाघमारे, आशिष गायके, गणेश इंगळे,दत्ता झुंबड, कडबा शिरसाट, अविनाश सुरडकर, सागर इंगळे, वैभव निकाळजे, दीपक भोसले, करण शिरसाट, युसुफ शेख, जायगुडे सर, सुरेश इंगळे, ज्ञानेश्वर काठोळे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129