
गुरुद्वारा दशमेश दरबार साहिबतर्फे पत्रकार दिन साजरा; पत्रकार बांधवांचा केला सन्मान
MH 28 News Live, चिखली : स्थानिक संभाजी नगर परिसरातील गुरुद्वारा दशमेश साहिब दरबारमधे पत्रकार दिनानिमत्ताने पत्रकार बांधवांचा दि.६ जानेवारी रोजी पत्रकार बांधवांचा शाल, हार देऊन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गुरुद्वारा समितीचे ज्येष्ठ सदस्य पत्रकार रमाकांत कपूर यांनी प्रास्ताविकामधे गुरुद्वारा द्वारे चालवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. अध्यक्ष राकेश चोपडा यांनी नियमित धर्म जागरण व समाज जागृतीच्या दृष्टीने केले जात असलेल्या कार्याची माहिती दिली.
सत्कार सोहळ्यानंतर गुरुद्वारा दशमेश दरबारमध्ये प्रत्येक पौर्णिमेला होत असलेल्या आरती अरदाससह लंगर साहिबच्या आयोजनात पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश शर्मा, युसुफ शेख, अमोल जोशी, तौफिक अहमद, पवन लढ्ढा, रेणुकादास मुळे, इफ्तिखार खान, रवींद्र फोलाने, सत्य कुटे, तन्जीम हुसेन, कमलाकर खेडेकर, इम्रान शहा, काशिनाथ शेळके, मोहन चोकेकर, सैय्यद साहिल, पीयुष भीमेवाल, शिवदास जाधव, राजेंद्र सुरडकर इत्यादी पत्रकार बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या आयोजनामध्ये अध्यक्ष राकेश चोपडा, राहुल चोपड़ा, किशोर चोपड़ा, रमाकांत कपूर, संजय चोपडा, राहुल खत्री, पप्पू सेठ पंजवाणी, अजय आयलानी, दत्ता सालकुटे, श्रेयस चोपडा, शैलेश धारे, लक्की पठ्ठे, अमोल खूनारे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला.