♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लोणार पोलिसांची वाहन चोरावर धडक कारवाई. अवघ्या दोन तासात वाहन चोर आरोपी केला गजाआड

MH 28 News Live, लोणार : शहरातून अशोक लेलँड दोस्त प्लस मालवाहू चार चाकी वाहन चोरी गेले असता लोणार पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत एका वाहन चोराच्या सिनेस्टाइल पाठलाग करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

याबाबत सविस्तर वृत्त असे की लोणार शहरातील ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणारे सलीम खान कलंदर खान यांचा अशोक लेलँड दोस्त प्लस कंपनीचे चार चाकी मालवाहू वाहन क्रमांक एम एच 28 बी बी 16 90 नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजे दरम्यान दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी जामा मस्जिद जवळ बाग येथील आपल्या कार्यालयासमोर उभे केले व दुसऱ्या दिवशी दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी सोमवारला बाजारला जाण्याकरता सकाळी चार वाजता गाडी जवळ आले असता त्यांना गाडी दिसून आली नाही गाडी चोरी झाल्याचे लक्षात आले.

त्यांनी पोलीस निरीक्षक लेखनिक चंद्रशेखर मुरडकर यांना याबाबत भ्रमणध्वनी वरून माहिती दिली चंद्रशेखर मुरडकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखता लोणार पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना घटनेबाबत सविस्तर माहिती दिली त्यानंतर पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी चोरीबाबत तपात चक्र वेगाने फिरवत आपले बुद्धी कौशल्य वापरत आवश्यक त्या सूचना देत गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे सदर वाहनाचा पाठलाग करण्यास सांगितले.

यावेळी पोलीस वाहनामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण खनपटे गोपनीय विभागाचे संतोष प्रभू चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर निकस चालक पोलीस हरिभाऊ ढाकणे.पोलीस निरीक्षक लेखनिक चंद्रशेखर मुरडकर यांनी सदर चोरी केलेल्या वाहनाचा सिने स्टाईल पाठलाग करत आरोपी मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद युनूस राहणार तारफैल अकोला याला मोठ्या शिताफीने पळून जाण्याच्या तयारीत असताना झडप घालत मुसक्या आवळल्या यावेळी आरोपी सोबत अजून दोन आरोपी होते ते पळून जाण्यात यशस्वी झाले.

यावेळी इतर आरोपीजवळ बजाज डिस्कवर कंपनीची एक दुचाकीही मिळून आली मालवाहू चार चाकी वाहन अंदाजे सहा लाख रुपये व बजाज डिसकवर कंपनीचे दुचाकी किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये असा एकूण सहा लाख 50 हजार रुपये किमतीचे वाहन आरोपी कडून ताब्यात घेण्यात यश मिळालें
फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध भादवी 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केले असून पुढील तपास लोणार पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज काळे पोलीस कॉन्स्टेबल नितीन खराडे करीत असून लवकरात लवकर फरार आरोपीला अटक करण्यात येईल अशी माहिती लोणार पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी दिली आहे.

आरोपीकडून या अगोदर झालेल्या चोरीचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे लोणार पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत असून या कारवाईने लोणार पोलिसांची मान जिल्हा पोलीस दलात उंचावली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129