
सर्पमीत्र श्रीराम रसाळ यांचा बुलडाणा तहसीलदार यांचे हस्ते सत्कार
MH 28 News Live, बुलढाणा : निसर्ग व वन्यजिव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीराम रसाळ यांनी आपला जिव धोक्यात घालुन काळ वेळाचे बंधन झुगारून कोरोना काळात लॉक डाऊन असतांना सुध्दा असंख्य जातीचे विषारी व बिनविषारी सांपाना मानवी वस्तीतून पकडून त्यांना जंगलामध्ये सोडून देऊन जिवदान दिले. नागरीकाना सापाच्या भितीपासून भयमुक्त केले या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन बुलडाणा *तहसील कार्यालयाचे तहसिलदार मा . खंडारे यांनी प्रसिध्दीपासून दूर असलेले सर्पमित्र श्रीराम रसाळ यांचे कार्याचा गुण गौरव करून आज तहसील कार्यालयाचे कर्मचारी आणि उपस्थीत मान्यवराचे साक्षीने शाल व श्रीफळ देऊन गौरव केला.
जिल्यातील सर्वच सर्पमीत्र हे निस्वार्थ भावनेने स्वखर्चाने साप पकडण्यासाठी जिल्हाभर अहोरात्र क्षणाचाही विलंब न करतात. नागरीकांना साप आढळून आला त्या ठिकाणी पोहचत साप पकडून नेण्याचे महान कार्य करतात. विषेश म्हणजे सर्पमित्राना कोणत्यानी प्रकारचे अर्थसहाय्य किवा मानधन मिळत नाही. या बाबीची प्रशासनाने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे असे मत अ.भा. अनिसचे दक्षिण बुलडाणा जिल्हा संघटक दता सिरसाट यांनी व्यक्त केले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button