♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बंद पडलेल्या टपाल जीवन विमा पॉलिसी सुरु करण्यासाठी संधी

MH 28 News Live, बुलडाणा : टपाल आणि ग्रामीण टपाल जीवन विमा पॉलिसीचा भरणा केला नसल्याने बंद पडलेल्या पॉलिसी पुनरुज्जीवीत करण्यासाठी विशेष संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याचा पॉलिसीधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या संधीचा लाभ घेण्यासाठी पॉलिसीधारकाला नजिकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा लागणार आहे. त्यासाठी पॉलिसीधारकांची वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार आहे. पॉलिसीधारकांना विमा लाभ मिळविण्यासाठी पॉलिसी पुनरुज्जीवीत करावयाची आहे, त्यांनी नजिकच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये दि. ३१ मार्च च्या आधी लेखी अर्ज करणे आवश्यक आहे. टपाल जीवन विमा पॉलिसीधारकांना आयकर विभागातर्फे ८० सी अंतर्गत सवलत देण्यात येत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री 1800 1805 232 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129