सामाजिक कार्यात पुढाकार घेवून समाजकार्य साधा : माजी न्यायाधीश सुरेश घोरपडे संभाजी नगर परिसरात संत रविदास महाराज जयंती साजरी
MH 28 News Live, चिखली कोणत्याही समाजाचा प्रगती ही त्या समाजातील शेवटच्या नागरिकांच्या सहभागातून होत असते. त्याकरिता प्रत्येक समाजातील व्यक्तीने जर किमान एक दिवस जरी समाजाकरिता खर्ची घातला तर भारतातील प्रत्येक समाजाचा सर्वांगिण विकास होऊ शकतो. तसेच त्या माध्यमातून प्रत्येक समाजामध्ये समता, स्वातंत्र्य व बंधूता साधता येणे शक्य असल्यामुळे प्रत्येकाने सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेवून समाजकार्य साधा असे आवाहन येथील प्रख्यात माजी न्यायाधीश सुरेश घोरपडे यांनी केले. ते संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
येथील संभाजी नगर परिसरात असलेल्या संत सेना भवनामध्ये संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४६ वी जयंती ता. ५ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समस्त समाजबाधवांसह नागरिकांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अध्यक्षस्थानी संत रविदास महाराज उत्सव समितीचे हिरामण डोंगरे, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी न्यायाधीश सुरेश घोरपडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, भारतामध्ये एस.सी.समाजामध्ये १५००, आदिवासी जातींमध्ये ७५० तर ओबीसी समाजामध्ये ३७५० जातीचा समावेश असून संत रविदास महाराज यांनी समाजातील घातक रूढी, प्रथांवर आघात करीत समाजामध्ये मानवता, समानता, बंधुत्व, स्वातंत्र्य निर्माण करण्याचे कार्य केले. राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेश याठिकाणी चर्मकार बांधव मोठ्या संख्येने असून रविदास महाराजांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले असून वर्षोनुवर्षे चालत आलेल्या अन्याय अत्याचार आणि शोषणाच्या विरूद्ध ते उभे राहिले. आपल्या असीम निष्ठेने, अविरत परिश्रम आणि सदाचारांच्या बळावर सर्वोच्च स्थान आणि सन्मान संघर्ष करून प्राप्त केला. जातीजातीत विभागलेल्या समाजाला एकतेच्या सूत्रात बांधून स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यांची अमृतवाणी ऐकून अनेक लोक त्यांचे शिष्य बनलेत. ज्यांनी गुरू रविदासांना गुरू मानून दीक्षा घेतली. त्यात प्रमुखत: चितोड राजघराण्याची राणी मीराबाई, राणी झाली, पीपाजी महाराज, सपना वरी, दिल्लीचा सुलतान सिकंदर शाह लोधी तसेच लक्षावधी स्त्री-पुरूष त्यांचे शिष्य बनले असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी समाजातील विशेष कामगिरी करणार्या नागपुर येथे कार्यरत असणार्या सौ. ज्योतीताई उतपुरे, चिखली बसस्थानकाच्या आगार प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल संतोष जोगदंडे, तर जालना येथे इनकम टॅक्स अधिकारीपदी विनोद डोंगरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी समाजातील पत्रकार विनोद खरे, पुरूषोत्तम चांदले, चंचरे, सुखदेव सिरसाट, निंबोळे, धनराज शिपणे, अॅड. राजपाल बडगे, लहाने, अनिल निंबोरे, शिंगणे, खंसरे यांच्यासह महिला नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन राजू खंसरे यांनी तर आभार सुखदेव सिरसाट यांनी मानले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button