♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखली अर्बन विद्यानिकेतनमध्ये पालकांसाठी मार्गदर्शन

MH 28 News Live, चिखली : विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यात वाटचाल करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते आणि ही गरज लक्षात घेऊन दि. चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेत बालसंस्कार केंद्र आणि शिक्षण अभियान जीवन विद्या मिशन मुंबई यांच्या वतीने मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. १० फेब्रुवारीला विद्यार्थ्यांसाठी तर ११ फेब्रुवारीला पालकांसाठी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या विशेष कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष सतीश गुप्त, शाळेच्या पालक संचालिका ज्योत्स्ना गुप्ता, दि. चिखली अर्बन उद्देशीय संस्था यांचे सचिव आशुतोष गुप्ता, शाळेच्या शैक्षणिक संचालिका पूजा गुप्ता, प्राचार्य गौरव शेटे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या सुनीताताई गायकवाड समिती सदस्य त्याचप्रमाणे नंदाताई बांगर समिती सदस्य यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना आपले अमूल्य असे मार्गदर्शन दिले.

मुलांच्या अंगी असलेले सुक्त गुणांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग असे भरारी घेतो आणि त्याच्या या भरारीने पालक देखील आनंदी होतात म्हणूनच दि. चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेमध्ये आदर्श विद्यार्थी व आदर्श पालकत्व कसे घडावे यासाठी बाल संस्कार केंद्र आणि शिक्षण अभियान जीवन विद्या मिशन मुंबई यांच्या वतीने प्रत्येक विद्यार्थी एक आदर्श भावी व्यक्तिमत्व घडावा या उद्देशाने व तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार व मुलांच्या अंगी गुण येतील सुप्त तेव्हाच होईल खरे आनंदी पालकत्व या पार्श्वभूमीवर आधारित या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

जीवनाकडे पाहण्याचा सामान्य लोकांचा दृष्टिकोन दैववादी, प्रारब्धवादी, नशिबवादी असा असतो. यशस्वी जीवन जगणे ही एक कला असून जीवन संगीताचे सात स्वर म्हणजेच जग, कुटुंब, शरीर, इंद्रिय बहिर्मन, अंतर्मन व परमात्मा. माणसाला हाताळता आले तर त्याचे जीवन संगीतमय होते समाजचे भवितव्य बहुतांशी त्याच्याच हातात असते कारण निसर्गाने माणसाला पूर्ण कर्म स्वातंत्र्य बहाल केले आहे आणि कर्म स्वातंत्र्याचा उपयोग कसा करायचा हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. अन्य कोणीही नाही. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे या शिबिरामध्ये सांगण्यात आलं.
मानवी जीवन स्वरबद्ध असून ते सप्त स्वरात गुंतलेले आहेत या सिद्धांताचे मानवास दर्शन घडविणारे एक सुंदर व यशस्वी जीवन शिल्प कसे साकार होते याचे साम्यक दर्शन घडविणारा एक अनमोल अमर ग्रंथ तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे पटवून देण्यात आले होते पालकांना उपलब्ध असलेल्या वेळेत आपल्या पाल्याशी सुसंवाद कसा साधावा त्यांना समजून कसे घ्यावे त्यांना आदर्श नागरिक कसे बनवावे हे या पुस्तकाच्या माध्यमातून पालकांना सहज समजेल .तसेच आजचे पालक होण्यासाठी निश्चित मदत होईल.

पालकत्वाची जबाबदारी निभावणे ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक बाब आहे .एकदा का तुम्ही पालक झाला की कायमचे पालक राहतात आणि ही जबाबदारी पूर्णपणे पार पाडणे पालकाचे कर्तव्य असते आणि ती कर्तव्य पूर्णपणे निभवणे हे संपूर्णपणे पालकाच्या हातात असते. त्यातूनच एक आदर्श पालकत्व निर्माण होत असते अशा प्रकारे या मार्गदर्शनाच्या माध्यमातून पालकांना अगदी व्यवस्थितपणे मार्गदर्शन करण्यात आलं.

या विशेष मार्गदर्शनाच्या वेळी पालकांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती व आनंदी पालकत्व कसे साधता येईल हे या मार्गदर्शनाच्या माध्यमातून सर्वांना कळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण पाटील सर यांनी केले. आभार प्रदर्शन भारती राजपूत मॅडमने केले. व कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129