♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

रविकांत तुपकरांसह २५ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; अकोला कारागृहात केली रवानगी

MH 28 News Live, बुलढाणा : पिकविमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई आणि सोयाबीन – कापसाच्या दरवाढीसाठी आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकर यांच्यासह २५ जणांना पोलिसांनी ११ फेब्रुवारी रोजी अटक करुन विविध गुन्हे दाखल केले. रात्री उशीरा वैद्यकीय तपासणी करत त्यांना चिखली येथे हलवण्यात आले. आज १२ फेब्रुवारी रोजी रविकांत तुपकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली; त्यामुळे तुपकरांसह २५ जणांची अकोला कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आणि महत्वपूर्ण मागण्या घेऊन रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना पोलिसांनी अचानक लाठीमार सुरु केल्याने परिस्थिती चांगलीच चिघळली होती. त्यानंतरही पोलिसांनी आपली ताठर आणि मुजोरीची भूमिका कायम ठेवत चक्क लोकप्रतिनिधींनाही तुपकरांना भेटण्यास पोलीस ठाण्यात येण्यास मज्जाव केला होता, शिवाय पत्रकारांनाही ठाण्यात येण्यास मनाई करण्यात आली होती.

रविकांत तुपकरांसह २५ जणांवर भादंवि ३५३, ३०९, १७१, १४७, १४८, १४९, ३३६, १०९, १८८ सह कलम ३ प्रॉपेट्री डॅमेज अँक्ट, सहकलम १३५ मुपोका नुसार गुन्हे १४९, ३३६, १०९, १८८ सह कलम ३ प्रॉपेट्री डॅमेज अॅक्ट, सहकलम १३५ मुपोका नुसार गुन्हे दाखल केले होते. मध्यरात्री उशीरापर्यंत या सर्वांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना चिखली येथे कस्टडी रुममध्ये ठेवण्यात आले. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात या सर्वांना बुलढाणा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. तुपकरांसह कार्यकर्त्यांना न्यायालयात आणण्यापूर्वीच न्यायालयाच्या प्रवेशद्वारासह परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. कुणालाच आत जाऊ देत नव्हते, अगदी वकिलांनाही अडवण्यात आले, हे विशेष. जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षांनी न्यायाधिशांच्या कानावर ही बाब टाकल्यानंतर न्यायाधिशांनी पोलिसांना सूचना दिल्यानंतर ओखळपत्र पाहून आत सोडण्यात आले. दरम्यान न्यायालयाने तुपकरांसह सर्वांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी विद्यमान न्यायाधिशांनी पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्यांच्या जखमांचे स्वत: निरीक्षकण करुन तशी नोंद घेतली असल्याची माहिती आंदोलकांच्या वकिलांनी दिली आहे. बुलढाणा कारागृहात जागा नसल्याचे कारण सांगत या सर्वांची अकोला कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी आकस बुद्धीने शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचे काम केले असून हेतुपुरस्करपणे अट्टल गुन्हेगारांसारखी वागणूक दिली असल्याचा आरोप रविकांत तुपकरांनी केला आहे. दरम्यान, अकोला कारागृहात सुध्दा रविकांत तुपकर आपले अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवणार असल्याची माहिती आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129