लोणारमध्ये होतोय महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा; तो पण विस्कळीत
MH 28 News Live, लोणार : शहराला महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून शहराला पाणी पुरवठा करणारी जनुना पाणी पुरवठा कारण नसतांना बंद करण्यात आली ती योजना पूर्ववत सुरु करावी यासह विविध मागण्या नगरसेविका सिंधू जाधव यांनी नगर पालिका प्रशासनाला केल्या असून पाणी पुरवठ्याची समस्या न सोडवल्यास बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा दिला आहे.
सिंधू जाधव यांनी सादर केलेल्या निवेदनात नवीन टाकीला जोडणी करण्याआगोदर घेण्यात आलेला चाचणी अहवाल बरोबर होता काय असा प्रश्न ही निवेदनातून आहे. अहवाल बरोबर नसेल तर बिले कशी काढण्यात आली ? तसेच नवीन टाकीला जोडणी करण्याअगोदर पंधरा दिवसातून एकदा शहराला नियमित पाणी पुरवठा होत होता मात्र नवीन टाकीला जोडणी केल्यानंतर एक महिन्यातून एकदा पाणी पुरवठा होत आहे. तीनशेच्या पाईप ला शंभरची जोडणी केल्याने उर्वरित जास्तीच्या पाण्याने पाण्याची टाकी वेळोवेळी ओव्हर फ्लो होत. असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.अर्धवट असलेली कामे पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा नगर पालिका कार्यालयात बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेविका सिंधू गजानन जाधव यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
येणाऱ्या काळात कडक उन्हाळा सुरु होत असून महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागू नये या करिता नगर पालिकेने तात्काळ उपाय योजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही होत आहे.
नागसेविका सिंधू गजानन जाधव यांनी नगर पालिकेत बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा दिल्यामुळे नगर पालिका प्रशासन काय कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button