♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखली मेहकर रोडवर अपघात, चार जण गंभीर जखमी

MH 28 News Live, मेहकर : चिखली मेहकर रोड वर चायगाव फाट्यावर अपघात होऊन चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना ही 7 मे ला दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली.

सविस्तर वृत्त असे की, चिखली मेहकर रोड वर चिखली कडून मेहेकर कडे जाणारे लाकडाने भरलेला ट्रॅक्टर चायगाव फाट्याजवळ ट्रॅक्टर चे टायर फुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. यामध्ये गजानन आडे, विलास राठोड, संतोष राठोड, बबन आडे, राहणार चायगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. घटना घडल्यानंतर ताबडतोब घटनास्थळावर हजर असणाऱ्या नागरिकांनी मदत करून जखमींना पुढील उपचारासाठी मेहेकर येथे पाठवले. तसेच घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मेहेकर पोलीस स्टेशनचे अशोक मस्के, रिंढे, व त्यांचे सहकारी यांनी पंचनामा केला. पुढील तपास मेहकर पोलिस करीत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129