अखेर लोणार पालिका प्रशासन ताळ्यावर; मुख्याधिकार्यांच्या आश्वासनानंतर नगरसेविकेचे आंदोलन मागे
MH 28 News Live, लोणार : शहराला महिन्यातून एक वेळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका सिंधू गजानन जाधव यांनी नवीन टाकीला जोडणी करण्याअगोदर घेण्यात आलेला चाचणी अहवालावर प्रश्न चिन्ह निर्माण केले होते. त्याची चौकशी करून विनाकारण बंद करण्यात आलेली जनुना पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरु करा या मागणी साठी श्रीमती जाधव यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत शहराचा पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर मुख्याधिकारी यांचे दालनात बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा दिला होता.
त्यांनी मुख्याधिकारी यांना मोबाईल वर वेळोवेळी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. शेवटी नाईलाजाने आज मुख्याधिकारी यांचे दालनात बैठा सत्याग्रह सुरु केला होता.
महिला नगरसेविकेचा बैठा सत्याग्रह सुरु होताच नगरपरिषद प्रशासन ताळ्यावर आले असून नगर परिषद प्रशासनाने आंदोलनाचा धसका घेत तातडीची कारवाई सुरु केली. जनुना पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरु करण्यात येईल व गावातील पाणी पुरवठा आठ दिवसात सुरळीत करणायाचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी भ्रमणध्वनीवरून दिल्याने ठाकरे गटाच्या शिवसेना नगरसेविका सौ सिंधू गजानन जाधव यांनी आपला बैठा सत्याग्रह मागे घेतला. या आश्वासनाचे पत्र नगर परिषदचे उपाध्यक्ष बादशाह खान पठाण अल्पसंख्यांक काँग्रेसचे तोफिक कुरेशी व नगरपरिषद पाणीपुरवठा अभियंता पवार यांनी नगरसेविकास सिंधु जाधव यांना दिले.
यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष गजानन जाधव, तालुका महिला अध्यक्ष संजीवनी जाधव, शाम राऊत, लुकमान कुरेशी, श्रीकांत मादनकर, दत्ता खरात, फकीरा डेंगळे,, ज्ञानेश्वर चोपडे, गणेश जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता येत्या आठ दिवसात न झाल्यास संपूर्ण नागरिकांना सोबत घेत शिवसेना उद्धव ठाकरेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेविकास सिंधू जाधव व कार्यकर्त्यांनी दिला आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button