
आ. फुंडकरांकडून पूजन व आरती नंतर.. खामगावात प्रभू श्रीरामाची भव्य शोभायात्रा
MH 28 News Live, खामगाव: आ. अँड आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते प्रभू श्री रामाचे पूजन व आरती नंतर खामगावात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. कोरोना काळानंतर दोन वर्षांनी आज श्री राम नवमीनीमित्त खामगाव शहरात भव्य शोभा यात्रा भक्ती भावाने काढण्यात आली.
भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ. अँड आकाशदादा फुंडकर यांचे शुभहस्ते दुपारी चार वाजता सिव्हिल लाईन भागातील प्रसिद्ध श्रीप्रल्हाद महाराज राम राम मंदिरात पूजा अर्चना करण्यात आली. प्रभू श्री राम , लक्ष्मण , माता सीता, व हनुमान यांच्या रजत मूर्तीला विधिवत अभिषेक आ. फुंडकर यांचे शुभहस्ते करण्यात आला. पूजन व आरती नंतर त्यांचे हस्ते सर्व मूर्तींना पालखीत विराजमान करण्यात आले. त्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य शोभयात्रेस सुरवात झाली.
सदर शोभायात्रा खामगाव शहरातील विविध भागातून गेली, यावेळी ठीक ठिकाणी हिंदू बांधवांनी प्रभू श्री रामाचे पूजन करून, फुलांची उधळण करून, ठीक ठिकाणी आतिषबाजी करून व गुलाल उधळून स्वागत करण्यात आले.



