
आ. श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून मोफत गर्भाशयमुख कर्करोग लसीकरण शिबीर
MH 28 News Live, चिखली : आ. श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसनिमित्त दि २७, २८ व २९ मार्च २०२२ रोजी भारतीय सिंधू सभा समर्पणदिनाचे औचत्य साधून गर्भाशयमुख कर्करोग लसीकरण शिबिर (Cervical Cancer Vaccination Camp) चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिरात देण्यात येणाऱ्या एका लसीची किंमत ३००० रूपये असून ९ ते १८ वयोगटातील मुलींना दोन लस तर १८ ते ४५ या वयोगटातील महिलांना दोन लस देण्यात येणार आहे . या लस १०० % मोफत देण्यात येणार असल्याने मुली व महिलांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आधार बहुउद्देशीय संस्था, कॅन्सर पेशंट एड असोसिएशन, भारतीय सिंधु सभा महिला शाखा चिखली आणि चिखली मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
भारतात महिलांमध्ये आढळून येणाऱ्या कर्करोगामध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग क्रमांक २ वर आहे. दरवर्षी भारतात जवळपास १ लाख २५ हजार नवीन केसेसची नोंद होते व त्यापैकी जवळपास ७० हजार मृत्यू होतात. या कॅन्सरचे मुख्य कारण आहे HPV [ Human Papilloma Virus] हा विषाणू. यापैकी ८० % सर्व्हायकल कॅन्सर हे HPV १६ / १८ याने होतात व त्याचीच प्रतिबंधक लस या शिबिरात देणार येणार आहे.
लसीबद्दल माहिती
जगात मागील १४ वर्षांपासून आतापर्यंत ३५० दशलक्ष व भारतात ५०० हजार स्त्रियांनी ही लस घेतलेली आहे. ही लस पूर्णत : सुरक्षित आहे. ही लस ९ – ४५ वर्षे वयोगटातील मुली व महिलांसाठी आहे. ९ – १८ वर्षे वयोगटातील मुलीसाठी २ डोस [पहिला डोस पहिल्या दिवशी, दुसरा डोस – ६ ते १२ महिन्यांच्या अंतराने] १८ – ४५ वर्षे वयोगटातील महिलांना ३ डोस [पहिला डोस पहिल्या दिवशी, दुसरा डोस – २ महिन्यांच्या अंतराने आणि तिसरा डोस ६ ते १२ महिन्यांच्या अंतराने घ्यावा लागतो.
गरोदर मातांनी ही लस घेऊ नये. ही लस १०० % प्रतिबंधक नाही. परंतु HPV १६ / १८ द्वारे होणाऱ्या गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून सर्वोत्तम संरक्षक आहे. बाजारात या लसीची किंमत ३ हजार रुपये आहे. मात्र शिबिरात ही लस पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. तसेच पुढील डोसेससुद्धा मोफत दिले जाणार आहेत.
नोंदणीसाठी संपर्क
डॉ. भारती गुरुदासानी संचालिका , भारतीय सिंधू सभा 9850377882, डॉ. अजाबराव वसू 9850388212 , डॉ. संध्या कोठारी 9422180129 ,
डॉ. उज्वला महेत्रे 9175758672 , डॉ. एस के अग्रवाल 880500093 , ,डॉ. राठी लद्धड 9763008616 , डॉ. पोहारकर 9767244888
डॉ. विठ्ठल काळूसे 8149220359 यांच्याशी संपर्क करावा . प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र याठीकाणी तसेच आशा सेविका , अंगणवाडी सेविका /मदतनीस आरोग्य सेविका / सेवक , यांच्याशी सुद्धा संपर्क केल्यास या आजाराबद्दल , लसिकरणाना बद्दल आणि नोंदणी बाबत माहिती मिळून इच्छुकांनी आपली नोदणी वेळेच्या आत करण्याचे आवाहन देखील
आधार बहुउद्देशीय संस्था, कॅन्सर पेशंट एड असोसिएशन, भारतीय सिंधु सभा महिला शाखा चिखली आणि चिखली मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.



