♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

गारपीट, अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची मागणी

MH 28 News LiVe, उदयनगर : गारपीट आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तसेच पीक विमा मिळावा, या मागण्यांसाठी किन्ही सवडत येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी २५ फेब्रुवारीला बेमुदत उपोषण सुरू केले.

२८ डिसेंबर २०२१ रोजी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, पीक विमा तसेच खरिप हंगामात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे मदत देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांसह ४५ ग्रामस्थांनी १५ फेब्रुवारीला चिखलीच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली होती. शेतकऱ्यांना २५ फेब्रुवारीपर्यंत मदत न मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालयसमोर २५ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला होता.

प्रशासनाने निवेदनाची दखल न घेतल्याने शनिवारी दुपारी ग्रामपंचायत सदस्या आरती दिवाने, उपसरपंच दुर्गा सवडतकर, ग्रा.पं. सदस्या सुषमा धुरंधर, राधिका घोराडे, विजय हेलगे, बबन धनोकार, नारायण ठाकरे, सुदाम बराटे, दयासागर बराटे, दीपक बराटे, ज्ञानेश्वर सवडतकर, अमोल बोहरपी यांच्यासह ग्रामस्थांनी बेमुदत उपोषणास सुरुवात

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129