
ड्रॅगनबोट राष्ट्रीय स्पर्धेकरीता प्रियंका गायकवाडला रौप्यपदक
MH 28 News Live, मेहकर : इंडियन कयाकिग अँड कनोंईग असोशिएशन यांनी आयोजित केलेल्या 11 वी राष्ट्रीय ज्युनिअर व सिनिअर पुरुष व महिला, मिक्स गट, ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा 23 ते 26 दरम्यान हेरुर, जिल्हा उडवी कर्नाटक येथे संपन्न झाली आहे.
महाराष्ट्र संघाला सीनियर मिक्स कॅटेगिरी मध्ये द्वितीय क्रमांक (रौप्य पदक) मिळाले आहे. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचे खेळाडू प्रियंका गायकवाड हिला रौप्य पदक मिळाले आहे.
महाराष्ट्राचे संघाचे प्रशिक्षक म्हणून बुलढाणा जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त श्रीराम निळे हे होते. मेहकर विधानसभा मतदार संघाचे बुलडाणा जिल्हा कंनोईग अँड कयाकिंग असोशिएशन अध्यक्ष तथा महाराष्ट्र असोशिएशन फॉर कनोईंग अँड कयाकिंग चे अध्यक्ष समीर मुगणेकर, दत्ता पाटील, प्रताप जामदार ,सुरेंद्र कोरे , ज्योती निळे व बुलडाणा जिल्हा सचिव निलेश इंगळे, किसन बळी, दिनेश इंगळे,विजय पळसकर , प्रकाश करंडे,दीपक माठे यांनी अभिनंदन केले आहे.